हास्य योगाचे जनक, सामाजिक कार्यकर्ते इन्द्रभान (भानुशेठ) भंडारी यांचे निधन

अहमदनगर- येथील सोने-चांदी ज्वेलरीचे व्यापारी हास्य योगाचे संस्थापक इंद्रभान घेवरचंद भंडारी उर्फ भानुशेठ (वय 79) यांचे रविवारी पहाटे निधन झाले.

अहमदनगर शहरात भल्या पहाटे निवडक पाच मित्रांसह त्यांनी हास्य योगा केंद्र सुरू केले. ते या चळवळीचे संस्थापक, जनक म्हणून सर्वत्र परिचित होते. भानुशेठ यांची भेट म्हणजे निखळ हास्याचा आनंद होता. शहरात व परिसरात विविध ठिकाणी त्यांनी हास्यकेंद्र सुरू केले. स्वत:च्या प्रांगणात त्यांनी सुरू केलेल्या केंद्रात रोज सकाळी 200 हून अधिक भगिनी हास्य- आरोग्याचा लाभ घेत आहेत.

स्व. भंडारी यांचे मागे पत्नी, 1 मुलगा, 3 मुली, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. सायंकाळी त्यांच्यावर अमरधाममध्ये अंतीम संस्कार करण्यात आले. यावेळी हजारो स्नेही-आप्त उपस्थित होते. त्यांचे इच्छेनुसार स्व. भंडारी यांचे नेत्रदान करण्यात आले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा