अहमदनगर जिल्हा एज्युकेशन सोसायटीच्यावतीने जिल्हा व राज्यस्तरीय भक्तिसुमन स्पर्धेचे आयोजन

अहमदनगर – अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्यावतीने सोसायटीचे माजी प्रमुख कार्यवाह स्व.अशोकभाऊ फिरोदिया व माजी सहकार्यवाह स्व. सुरेशभाऊ भालेराव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ 17 ऑगस्ट व 18 ऑगस्ट रोजी दोन दिवस सकाळी 7 ते रात्रौ 8.30 पर्यंत जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय भक्तिसुमन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजिका श्रीमती छायाताई फिरोदिया यांनी दिली.

त्या पुढे म्हणाल्या ही स्पर्धा एकुण सत्रामध्ये होणार असून अ.ए.सोसायटीचे अशोकभाऊ फिरोदिया सभागृहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व एकुण 1,20,000/- रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.

या भक्तिसुमन स्पर्धेमध्ये मराठी भाषेतील अभंग (संतरचना), आधुनिक कवींच्या भक्तिरचना व मराठी चित्रपटातील शास्त्रीय संगीतावर आधारित भक्तीरचनांचा समावेश करण्यात आला आहे.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी या स्पर्धेतून स्पर्धक व कलेला प्रोत्साहन देणे तसेच संगीत क्षेत्रात विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे व राज्यस्तरीय गुणीजनांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळून साधकांचे आत्मपरीक्षण व्हावे असे त्या म्हणाल्या. या स्पर्धेसाठी जिल्हा व राज्याच्या कानाकोपर्‍यातून स्पर्धकांची हजेरी लागणार आहे. नगर जिल्हास्तरीय स्पर्धेतून विजेत्या स्पर्धकांनाच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रवेश दिला जाणार असल्याची महत्वपूर्ण माहिती आयोजकांनी दिली.

या स्पर्धेचे समन्वयक म्हणून गायक पवन नाईक हे काम पाहत आहेत. स्पर्धेच्या नियोजनासाठी विविध समित्यांचीही स्थापना करण्यात आली आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण स्पर्धेच्या ठिकाणी संगीततज्ज्ञ व समिक्षक श्रीराम तांबोळी तसेच साहित्य व संगीत तज्ज्ञ डॉ. मधुसूदन बोपर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे.

नगर येथे जिल्हा व राज्यस्तरीय भक्तिसुमन स्पर्धेच्या निमित्ताने नगरमधील रसिकांना या भक्तीगजराची चांगली पर्वणीच ऐकावयास मिळणार आहे. दोनही दिवसांच्या स्पर्धेचा शुभारंभ स्पर्धेमध्ये प्रथम कला प्रस्तुती करणार्‍या स्पर्धकाच्या व मान्यवर परीक्षकांच्या हस्तेच करण्यात आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा