मिश्र डाळींची भजी

साहित्य – मूग, मसूर, उडीद, हरभरा, तूर इ. सर्व प्रकारच्या डाळी एकूण 250 ग्रॅम होतील एवढ्या घ्या. थोडीशी कोथिंबीर, 3-4 हिरव्या मिरच्या, खाण्याचा सोडा अर्धा लहान चमचा, मीठ 1 लहान चमचा, मिरची पूड 1 लहान चमचा, कांदे 2, आले 2 गाठी, तूप 250 ग्रॅम.

कृति – सर्व डाळी निवडून 4-5 तास आधीच भिजत घाला. त्या व्यवस्थित भिजल्यानंतर बारीक वाटून घ्या. आले व कांदा बारीक किसून घ्या. सारे मसाले वाटलेल्या डाळीत मिसळून व्यवस्थित फेटून घ्या व गरम तुपात भजी तळून घ्या व टोमॅटोच्या किंवा कोथिंबीर-पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा