रात्र प्रशालेत सक्षम व आदर्श नागरिक बनविण्याचे कार्य – डॉ.पारस कोठारी

भाईसथ्था नाईट हायस्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार व नवागतांचे स्वागत

अहमदनगर – भाईसथ्था नाईट हायस्कूलचे विद्यार्थी दिवसा कष्ट करून रात्री ज्ञानार्जनाचे काम करत आहेत. नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून रात्र प्रशालेत सक्षम व आदर्श नागरिक बनविण्याचे कार्य भाईसथ्था नाईट हायस्कूलमध्ये केले जाते, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे उपकार्याध्यक्ष तथा भाईसथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ. पारस कोठारी यांनी केले.

हिंदसेवा मंडळाच्या ज्युनिअर कॉलेज, भाईसथ्था नाईट हायस्कूलमध्ये 10 वी आणि 12 वी परीक्षेत यशस्वी गुणवंतांचा सत्कार व नवागतांचे स्वागत शैक्षणिक साहित्य व गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. तसेच मोफत पाठयपुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हिंदसेवा मंडळाचे उपकार्याध्यक्ष डॉ. पारस कोठारी बोलत होते.

याप्रसंगी नगरसेवक गणेश कवडे, सामाजिक कार्यकर्ते सागर चवंडके, कार्याध्यक्ष अजित बोरा, प्राचार्य सुनिल सुसरे, प्रा.संजय साठे, जेष्ठ शिक्षक देवीदास खामकर, अमोल कदम, गजेंद्र गाडगे, अनिरुद्ध देशमुख, महादेव राऊत, कैलास करांडे, अशोक पिपाडा, गणेश गवळी, श्री. शिंदे, रामदासी, कर्डिले, कोंडेजकर, बालटे, सौ. साठे, सौ. दुराफे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा म्हणाले कि, भाईसथ्था नाईट हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व नवागतांचे स्वागत करतो. रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे. 12 वी नंतर शिक्षणासाठी हिंद सेवा मंडळाचे सारडा कॉलेजला विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

नगरसेवक गणेश कवडे म्हणाले की, महाराष्ट्रात नावलौकिक असलेल्या भाईसथ्था नाईट हायस्कूलचे विद्यार्थी मोठ्या पदापर्यंत पोहोचले आहेत. माझा भाऊ या शाळेत शिक्षण घेऊन हेड कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहे. समाजाला दिशा देणारे विद्यार्थी येथे घडले आहेत. शिकाल तर टिकाल अशी परिस्तिथी आहे. दिवसा कष्ट करून शिक्षण घेणे ही कौतुकास्पद बाब आहे.

प्रास्तविक प्राचार्य सुनिल सुसरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शरद पवार यांनी केले तर आभार प्रा.मंगेश भुते यांनी मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा