झेंडीगेट येथे गोमांस पकडले

अहमदनगर- राज्य शासनाची बंदी असताना विनापरवाना बेकायदेशीरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्रीसाठी जाणार्‍या रिक्षा टेम्पोस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून पकडले. ही कारवाई रविवारी (दि.11) सकाळी 10 वा. झेंडीगेट येथील हमालवाडा येथे केली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली की झेंडीगेट हमालवाडा येथे मतीन ख्वाजामियॉं कुरेशी (वय 40, रा. हमालवाडा, झेंडीगेट) हा गोवंशी जनावरांचे मांस विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी त्यास शिताफीन अटक करून त्याच्या ताब्यातील 105 किलो वजनाचे गोवंशीय जनावरांचे मांस व रिक्षा असा 13 हजार 600 रूपयांचा माल जप्त केला.

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पो.कॉ. कमलेश पाथरूट यांच्या फिर्यादीवरून भादंविक 269, महाराष्ट्र पशु संवर्धन अधिनियम सन 2015 चे कलम 5 क व 9 अ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन अधिक तपास पो.ना. शेख हे करीत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा