फेशिअल करताना घेण्यात येणारी काळजी

नॉर्मल स्कीनसाठी (सामान्य त्वचा) : नॉर्मल स्कीनमध्ये ताजगी व लवचिकपणा असतो. अशी त्वचा जास्त तेलकट किंवा जास्त कोरडी नसते. या त्वचेची व्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने चेहरा स्वच्छ धुवावा नंतर क्लिंजिक मिल्कने स्वच्छ करावा. त्यानंतर चांगल्या क्रिमने मसाज करायला हवा. सर्वांत शेवटी चेह-याला कापसाने स्वच्छ पुसून काढावे. हे फेशिअल रात्री करायला पाहिजे. याने चेहरा स्वच्छ व आकर्षक दिसेल.

ड्राय स्कीन (कोरड्या त्वचेसाठी) : ड्राय स्कीन दिसायला नीरस व कोरडी दिसते. ड्राय स्कीनवर नैसर्गिक प्रभाव लवकर पडतो. त्वचेची योग्य देखरेख नाही केली तर लवकरच सुरकुत्या पडायला लागतात. अशाप्रकारच्या त्वचेवर साबण कमी कमी वापरला पाहिजे. ज्या महिलांची त्वचा कोरडी असेल त्यांनी ए, बी, सी आणि डी जीवनसत्त्वाचा उपयोग केला पाहिजे. चेहरा नेहमी ग्लिसरीनयुक्त साबणाने धुतला पाहिजे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा