बर्गर

साहित्य – 6 बर्गर पाव, मेयोनीज आणि मस्टर्ड सॉस आवश्यकतेनुसार.

कटलेटसाठी – 6 उकडलेले बटाटे, 1/4 कप मटार आणि फेंचबीन्स (दोन्हीही वाफवलेले), बारीक चिरलेले गाजर आणि 5 हिरव्या मिरच्या, अर्धा टी स्पून आले पेस्ट, अर्धा ब्रेडचा चुरा, 2 टे स्पून कॉर्नफ्लोर, मीठ चवीनुसार.

सॅलॅडसाठी – कांदा, काकडी आणि टोमॅटोच्या चकत्या, थोडीशी सॅलॅडची पाने, थोड्याशा चीज स्लाइसेस, टोमॅटो सॉस, मीठ चवीनुसार.

कृति – कटलेटचे सर्व साहित्य एकत्र करून मध्यम आकाराच्या टिक्की (वड्या) बनवून घ्या. टिक्की ब्रेडच्या चुर्‍यामध्ये घोळवून गरम तेलामध्ये तळून घ्या. बर्गरचा पाव मधोमध कापून घ्या. पावाच्या दोन्ही बाजूला मयोनीज आणि मस्टर्ड सॉस लावा. नंतर एका भागावर कांद्याची स्लाइस आणि सॅलॅडचे पान ठेवा.

नंतर कटलेट, चीज स्लाइस, काकडी आणि टोमॅटोच्या स्लाइस ठेवा व ओव्हनमध्ये 2-3 मिनिटे ग्रील करा. गरम गरम बर्गर फ्रेंच फ्राइज बरोबर सर्व्ह करा.