लाल भोपळा – आंबा बर्फी

साहित्य – लाल भोपाळा किसून दीड कप, हापूस आंब्याचा रस दीड कप, साखर दोन कप, पिठी साखर पाव कप, तूप दोन चमचे, खवा पाव कप, सायट्रीक अॅसीड पाव चमचा, वेलदोडे पूड एक चमचा.

कृती – तूपात मंद विस्तवावर भोपळ्याचा कीस झाकण घालून शिजवावा. करपू नये म्हणून हलवावा. झाकणावर पाणी घालावे. शिजल्यावर त्यात साखर, घुसळलेला आमरस, खवा व सायट्रीक अॅसीड घालून मोठ्या विस्तवावर शिजत ठेवून सारखे हलवावे. नाही तर खाली लागतो.

मिश्रण चिकट होवून सुटू लागले की उतरवून पिठीसाखर घालून चांगले घोटावे. ताटाला तूपाचा हात लावून त्यावर मिश्रण पसरावे. कोमट असतानाच वड्या कापून काढाव्यात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा