बाजरी भात

साहित्य : 2 वाटी बाजरी, 2 मोठे चमचे साजूक तूप, जिरे, हिंग, ओवा आणि मीठ.

कृती : बाजरी धुवून 30 मिनिटं पाण्यात भिजत ठेवावी. कुकरमध्ये तूप तापवून त्यात हिंग, जिरे आणि ओवा टाकावा. बाजरी पाण्यातून काढून कुकरमध्ये टाकून चांगली खमंग परतावी.

नंतर त्यात मीठ आणि साडेतीन वाटी गरम पाणी टाकावं. कुकर बंद करून वाफ येऊ द्यावी. दोन शिट्ट्या घेऊन गॅस बंद करावा. कुकरमधली वाफ संपूर्ण जिरल्यावरच कुकर उघडावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ही खिचडी दह्याबरोबर खाण्यास द्यावी.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा