बहुजन समाज पार्टी नगरमध्ये विधानसभेच्या सर्व जागा लढविणार

अहमदनगर – बहुजन समाज पार्टी अहमदनगर विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्णय पुणे येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या प्रदेश कमिटीच्या बैठकित घेण्यात आला. बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकित अहमदनगर दक्षिण व उत्तर विभाग विधानसभेची जबाबदारी बसपाचे जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव यांच्यावर सोपविण्यात आली असल्याची माहिती जिल्हा महासचिव राजू शिंदे यांनी दिली.

या बैठकिसाठी प्रदेश सचिव काळूराम चौधरी, झोन प्रभारी किरण आल्हाट, सुदिप गायकवाड, दादासाहेब गायकवाड, जिल्हा प्रभारी संजय डहाणे, बापूसाहेब कुदळे, बाळासाहेब आवारे, जिल्हा उपाध्यक्ष शंकर भैलूमे आदी पदाधिकारी उपस्थित होते. दि.27 ऑगस्ट रोजी कर्जत येथे विधानसभेच्या पार्श्‍वभुमीवर जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येणार असून, यासाठी बसपाचे राज्यातील नेते उपस्थित राहणार आहेत. बसपाच्या तिकीटावर निवडणुक लढविण्यास जिल्ह्यातील अनेक नेते संपर्कात असून, प्रत्येक मतदार संघात योग्य उमेदवार देऊन तो निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे उमाशंकर यादव यांनी सांगितले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा