बाबासाहेब भोंजाळ यांचे अल्प आजाराने निधन

टेलिफोनचे निवृत्त सिनिअर असिस्टंट

अहमदनगर – दिगंबर तथा बाबासाहेब नरहर भोंजाळ (वय 90, रा. सांगळेगल्ली, नगर) यांचे सोमवारी (22 रोजी) सकाळी 9 वा. अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 1.30 वा. नालेगाव अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते.

ते टेलिफोन कार्यालयातून सिनिअर असिस्टंट म्हणून सेवानिवृत्त झाले होते. सेंट्रल गव्हर्नमेंट सर्व्हन्टस् पेन्शनर असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. ते अ.ए.सो.च्या माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष होते. त्यांनी शब्दगंध साहित्य संमेलनात सहभाग घेऊन कविता सादर केल्या होत्या.

त्यांच्या पश्चात 1 मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा