आयुर्वेदीय आहारवेद काय खावे?

बीट

3) बिटामध्ये अल्कली गुण, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, लोह हे घटक असल्यामुळे शरीराला अतिरिक्त आम्लामुळे होणारा त्रास नाहीसा करण्यासाठी बिटाचा रस काढून घ्यावा. हा रस प्यायल्याने मूत्रपिंड, पित्ताशय, आतडे स्वच्छ होते व शरीरातील अतिरिक्त आम्ले ही मूत्रावाटे किंवा शौचावाटे बाहेर पडतात.

4) हृदयरोग, मधुमेह, हाय कोलेस्टेरॉल असणार्‍या व्यक्तींनी साखरेऐवजी गोड पदार्थ म्हणून बीट खावे. यामध्ये कमी प्रमाणात उष्मांक असल्यामुळे तसेच यातील साखरही नैसर्गिक असल्यामुळे कोणतेही दुष्पपरिणाम न होता साखर लगेचच रक्तात शोषली जाते.

5) गाजर, दुधी भोपळा या प्रमाणेच बिटाचाही हलवा करता येतो किंवा या तिन्हींचाही मिळून एकत्र हलवा केल्यास तो शरीरासाठी जास्त आरोग्यपूर्ण, रुचकर व शक्तीदायक होतो.

6) भूक न लागणे, अपचन, तोंडाला चव नसणे, उलट्या, जुलाब या विकारांवर बीटच्या रसात अर्ध लिंबू पिळून तो रस अर्धा कप सकाळ-संध्याकाळ घ्यावा. असे केल्याने पचन व्यवस्थित होऊन भूक व्यवस्थित लागते.

7) कावीळ, आंत्रव्रण, आम्लपित्त या विकारांवर बिटाच्या पानांचा रस सकाळसंध्याकाळ एक कप प्यावा.

8) बीटमध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असल्याने आतड्यातील मल पुढे ढकलून आतडे स्वच्छ करण्याचे काम बीट करते. म्हणून मलावष्टंभाची तक्रार असणार्‍यांनी शौचास साफ होण्यासाठी बीट नियमितपणे खावे.

9) बिटाच्या पानांचा काढा केसातील कोंडा नाहीसा होण्यासाठी, तसेच केसांतील उवा नाहीशा करण्यासाठी, केस धुण्यासाठी वापरावा. यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहून केस लांबसडक होतात.

10) डोक्यातील चाई नष्ट करण्यासाठी बिटाच्या पानांचा रस डोक्याला चोळावा. याने चाई कमी होण्यास मदत होते.

11) बीट, काकडी, गाजर, पपई यांचा रस एकत्रित करून घेतल्यास शरीर आरोग्यपूर्ण राहते.

12) मानसिक थकवा वारंवार जास्त जाणवत असेल, तर अशा वेळी बिटाचा रस कपभर दोन वेळा घ्यावा. बिटाच्या पानांची भाजी, थालीपीठ, पराठा तसेच बिटाची कोशिंबीर, हलवा, सॅलड अशा विविध स्वरूपात बिटाचा स्वास्थ्यरक्षणार्थ आहारामध्ये वापर करावा.

सावधानता : बीट हे कंदमूळ पचण्यास जड असल्यामुळे भूक मंद असणार्‍यांनी व पचनशक्ती कमी असणार्‍यांनी त्याचा वापर योग्य प्रमाणातच करावा. एकदम बीट खाण्यापेक्षा थोड्या प्रमाणात नियमित खावे. अतिरिक्त प्रमाणात खाण्यात आल्यास पोटात गुबारा धरून जुलाब होऊ शकतात.

अन्नमूल्य (बीट) खनिजे व जीवनसत्त्वे
आर्द्रता 87.7%             कॅल्शिअम 18 मि.ग्रॅ.
प्रथिने 1.7%                फॉस्फरस 55 मि.ग्रॅ.
मेद 0.1%                   लोह 1.0 मि.ग्रॅ.
खनिजे 0.8%               ‘क’ जीवनसत्व 10मि.ग्रॅ
तंतुमय पदार्थ 0.9%       ‘अ’ व ‘ब’ जीवनसत्वे बर्‍याच प्रमाणात
पिष्टमय पदार्थ 8.8% बी कॉम्प्लेक्स किंचित प्रमाणात
100 ग्रॅम खाद्य भागातील मूल्ये कॅलरी मूल्य 43

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे
दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर
अहमदनगर मोबाईल नं- 8793400400
वेळ स. 9 ते 12