माणसाने स्वतःच्या नजरेत खरे राहीले पाहीजे बाकी तर कित्येक लोक हे देवावरही नाराज असतात …!

इतर लोक आपल्याशी वाईट वागले तर आपण दुःखी होतो.. आणि इतरांनी प्रशंसा केली की आपण खुश होतो…म्हणजे आपले सुख दुःख हे इतरांवर अवलंबून आहे काय ? “नाही”.. आपल्या सुखदुःखाची चावी इतरांच्या हातात का द्यायची ?आपण जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींला आपले चांगलेपण सिद्ध करू शकत नाही..!

आपण उत्तम व्यक्ती आहोत हे फक्त आपल्याला समजून घेणाऱ्या व्यक्तीच समजू शकतात.. त्यामुळे इतरांना आपल्याबद्दल काय वाटते याचा विचार करण्यापेक्षा आपल्या दृष्टीत आपण कसे आहोत हे महत्त्वाचे असते.. माणसाने स्वतःच्या नजरेत खरे राहीले पाहीजे बाकी तर कित्येक लोक हे देवावरही नाराज असतात …!

आपण स्वतःच्या नजरेत श्रेष्ठ राहण्यासाठी आपले अंतकरण नेहमी शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा आणि चांगल्या भावनांनी इतरांची मदत करत राहा.. कुणाची मदत करायला ‘धन’ आवश्यक नाही तर चांगले ‘मन’ आवश्यक असते ..जे बिना जाहीर करता.. बिना दिखावा करता ..इतरांची मदत करतात त्यांच्या मदतीला देवही धावून येतात…!
                                                                                          -सौ.पूजा गुंदेचा