वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद

नगर- महामार्गावरुन जाणार्‍या वाहनचालकांना रस्त्यात अडवून त्यांना मारहाण करुन लुटणारी टोळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केली. या कारवाईत कारसह चौघांना अटक केली.

ही कारवाई कालिकानगर बीड येथे केली. याबाबत अधिक माहिती अशी की, इमामपूर घाटात कृष्णा कनसे (रा.औरंगाबाद) यांना रस्त्यात अडवून चौघांनी मारहाण करुन त्यांच्याकडील ह्युंदाई कार, गॉगल, मोबाईल असा 10 हजार 35 हजाराचा ऐवज चोरुन नेला.

या घटनेतील आरोपी कालिकानगर परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पेालिसांना मिळाली. यावरुन पोलिसांनी कालिकानगर परिसरात सापळा लावून कार (क्र.एमएच 12 ईएन 9955) ला घेराव घालून थांबविले व आतील चौघांना नाव विचारले असता त्यांची नावे परशुराम उर्फ प्रशांत मोहन गायकवाड (वय 19, रा.एकनाथवाडी, पाथर्डी, हल्ली बीड), ईस्लाईल अमीर शेख (रा.संजयनगर, गेवराई बीड), तुकाराम अशोक पांचाळ (रा.पैठण केज, बीड), रामेश्‍वर प्रल्हाद लाटे (रा.वेल्लोरा, बीड) असे असल्याचे समजले. त्यांच्याकडील कारचे कागदपत्रे मागितले असता कागदपत्रे नसल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक चौकशी केली असता त्यांचे अन्य साथीदार गणेश मोतीराम गायकवाड, भिमा साधू लवांडे यांच्यासह इमामपूर घाटात कारचालकास अडवून मारहाण करुन लुटल्याची कबुली दिली. यावरुन पोलिसांनी त्यांच्याकडील ह्युंदाई कार व इंडिका कार (क्र.एमएच 48 एफ 468) असा 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक आरोपींना अधिक तपास कामी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा