प्रवाशांना लुटणार्‍या रिक्षा चालकास अटक

अहमदनगर – शहरात रात्रीच्या वेळी प्रवाशांची लुटमार करणार्‍या रिक्षा चालकास कोतवाली पोलिसांनी शिताफीने अटक केली. ही कारवाई रविवारी (दि.23) केली.

याबाबतची माहिती अशी की, किरण विश्‍वनाथ औसरकर (वय-36, रा. बुरूडगाव वाळकी रोड, मनपा कचरा डेपो जवळ, नगर) असे अटक केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. औसरकर हा त्यांची रिक्षा (क्र. एम एच 16 बी 9428) ने चांदणी चौक येथुन प्रवासी वाहतुकीचे काम करतो. चांदणी चौकापासुन पुणे स्टॅण्ड क्र. 3 येथे 80 रूपये भाडे ठरवुन त्याने प्रवासी रिक्षात बसवला सुट्टे पैसे नसल्याने कारणाने आयुर्वेद कॉर्नर परिसरात येऊन प्रवाशास मारहाण करून 4 हजार 900 रूपये काढुन घेतले. या प्रकरणी सुदर्शन बाबासाहेब देशमुख (रा. सोलापुर) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून किरण औसरकर याला रिक्षासह पकडले. ही कारवाई पोलिस नाईक गणेश धोत्रे, शाहिद शेख, नितीन शिंदे, पो.कॉ. भरत इंगळे, सुजय हिवाळे यांनी केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा