आर्किटेक्ट इंजिनिअर्स अॅण्ड सर्व्हेअर्स असो.च्यावतीने पुरग्रस्तांना मदत

अहमदनगर- महाराष्ट्राची संस्कृती महान आहे. प्रत्येकाने आपल्या संस्कृतीचे जतन करुन समाजामध्ये प्रत्येकाने माणुसकीचे जतन केले पाहिजे. कोल्हापूर, सातारा, सांगली येथे महापुराने थैमान घातल्यामुळे तेथील जीनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. माणुसकीच्या नात्याने नगर येथील आर्किटेक्टस् इंजिनिअर्स अॅण्ड सर्व्हेअर्स असो.च्या वतीने नगरकरांना मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. नगरकरांनी मोठ्या संख्येने मदत केली. नगरकरांनी खर्‍या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडविण्याचे काम केले आहे. असोसिएशनने नेहमीच सामाजिक भावनेतून मदत करण्याचे काम केले आहे. असे प्रतिपादन असो.चे अध्यक्ष सलीम शेख यांनी केले आहे.

कोल्हापूर, सातारा, सांगली येथे झालेल्या पुरग्रस्त भागातील नागरिकांसाठी सावेडी प्रोफेसर कॉलनी चौक येथे मदतीसाठी आर्किटेक्ट इंजिनिअर्स अॅण्ड सर्व्हेअर्स असो.च्यावतीने स्टॉल उभारण्यात आला होता. यावेळी अध्यक्ष सलीम शेख, आदिनाथ दहिफळे, अन्वर शेख, अशोक सातकर, अभिजित देवी, शोएब खान, एकनाथ जोशी, प्रदीप तांदळे, भुषण पांडव, सुरेंद्र धर्माधिकारी, प्रशांत आढाव, विशारद पेठकर, अजय लालबागे, नितीन मकासरे, प्रथमेश सोनावणे, भालचंद्र सोनवणे, अनिल गाडगे, सुशांत जगताप, दिनेश सचदेव, रितेश कांकरिया, विजय पादीर, सुनील आकडे, अरविंद वाबळे, अनिल लवांडे, सुरेश परदेशी, संजय पवार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रदीप तांदळे म्हणाले की, असोसिएशनच्यावतीने नगर शहरातील जनतेला मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. आज प्रोफेसर कॉलनी चौकात स्टॉल लावून मदत स्विकारली. नगरकरांनी मोठ्या प्रमाणात मदत करुन सामाजिक भावनेतून दर्शन घडविण्याचे काम केले. यावेळी रोख रक्कम, किराणा वस्तू, पॅकेजिंग फुड, पाणी बॉटल, साखर, तांदूळ, पोहे, डाळ, गहू, तेल बिस्कीट, कपडे, चादर, शाल, रजई, ब्लँकेट, बेडशीट असे दोन ट्रक माल भेट देवून सहकार्य केले. याबद्दल असोसिएशनच्यावतीने नगरकरांचे आभार मानण्यात आले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा