अप्पासाहेब राजळे यांनी आयुष्यभर माणसे जोडण्याचे काम केले – बाळासाहेब थोरात

पाथर्डी- अप्पासाहेब राजळे हे नगर जिल्ह्यातील जुनं जाणत नेतृत्व या नेतृत्वाने अनेक ऊन, पावसाळे पाहिले, सुखदुःखाला सामोरे जात आयुष्यभर माणसे जोडण्याचे काम केले. त्यांचे काम नव्या पिढीला आदर्शवत आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले.

जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आप्पासाहेब राजळे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त कासार पिंपळगाव येथे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राम शिंदे होते.

आ. थोरात पुढे म्हणाले की, आमचे जरी नात्याचे संबंध असले तरी नात्यापलिकडचा जिव्हाळा त्यांनी जपला आहे राजू भाऊ नंतर त्यांचा मुलगा होऊन त्यांचा सत्कार आयोजित करणे आणि तोही नियोजन पद्धतीने करणे याचे श्रेय आ. मोनिका राजळे यांना द्यायला पाहीजे.

गृहमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आप्पासाहेब राजळे यांच्याकडे संघटन कौशल्य असल्याने त्यांनी जिल्ह्यात आपली नाळ जोडली आहे. त्यांचा आदर्श घेऊन आ. मोनिका राजळे या नेतृत्व करीत आहेत, लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड दबाव असताना त्यांनी दक्षिणेतून सर्वाधिक मताधिक्य आपल्या तालुक्यातून सुजय विखे यांना दिल्याने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आमचे काम आहे. कार्यकर्त्यांनी किंतु-परंतु मनातून काढावा आणि मोनिका राजळे यांच्या मागे आपली ताकद उभी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राम शिंदे म्हणाले की सातत्याने प्रत्येक मंत्र्यांशी संपर्क साधत मोठ्या प्रमाणात विकासनिधी मतदार संघात आणण्याचे काम मोनिका राजळे यांनी केलेले आहे, त्यांच्याकडे काम करण्याची स्वतंत्र पद्धत असल्याने त्यांनी मोठा विकास निधी आणलेला आहे.

विधानसभेचे उपसभापती विजय औटी म्हणाले की, आप्पासाहेब राजळे यांचे जीवन मला जवळून अनुभवता आले. एक प्रगल्भ नेता मला माझ्या आयुष्यात पाहायला मिळाला याचे मला समाधान वाटते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून राजाभाऊंनी विधानसभा गाजवली आणि आज कार्यातून मोनिका राजळे त्यांचा आदर्श पुढे ठेवीत आहेत. घरात तीन आमदार होणे ही सोपी गोष्ट नाही, पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील जनतेचे राजळे यांच्या कार्यावर व घरण्यावरील असलेले प्रेम यामुळे शक्य झाले.

यावेळी ह.भ.प. दिनकर महाराज वरुरुकर, माजी खा. दिलीप गांधी, आ. शिवाजीराव कर्डिले, आ. संगीता ढोबरे, बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार यांनीही काकांना शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी प्रास्ताविक करताना आ. मोनिकाताई राजळे म्हणाल्या की, या तालुक्याने काकांवर भरपूर प्रेम केलेले आहे त्यांचा पंच्याहत्तरी निमित्त गौरव व्हावा अशी इच्छा त्यांच्या मित्रमंडळाची होती म्हणून त्यांनी या सत्काराचे आयोजन केलेले आहे. त्यांचे पाठबळ सातत्याने माझ्या पाठीशी असते म्हणून मी संघर्षातही लढा देऊ शकले असे त्या म्हणाल्या.

यावेळी पुरगस्त निधीसाठी त्यांनी आपले एक महिन्याचे मानधन, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना कामगारांच्यावतीने आपल्या शिक्षण संस्थेच्यावतीने अंदाजे दहा लाखाची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार होते पण राज्यातील पूर परिस्थितीमुळे येऊ शकले नाहीत त्यांची चित्रफितीद्वारे त्यांनी आप्पासाहेब राजळे यांना शुभेच्छा दिल्या. आपण राजीव राजळे यांचे चांगले मित्र आहोत या नात्यातून मोनिकाताई मध्ये खंबीरपणे उभे राहू असे सांगितले. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे या आजारी असल्याकारणाने येऊ शकल्या नाहीत. त्यांनीही ऑडिओ क्लिपद्वारे आपला संदेश पाठवला.

या कार्यक्रमास आ. सुधीर तांबे, माजी आ. शंकराव गडाख, बबनराव पाचपुते, पांडुरंग अभंग, भानुदास मुरकुटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, अरुण कडू, मंजुषा गुंड, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष करण ससाणे, दौंडचे माजी नगराध्यक्ष विरधवल जगदाळे, माजी खा. दादा पाटील शेळके, माजी आ. चंद्रशेखर कदम, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, बन्सीभाऊ म्हस्के, डी.एम. कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आभार वृद्धेश्वर कारखान्याचे संचालक सुभाष साठे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर व विना दिघे यांनी केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा