अॅॅपने व्यवहार करताना सावधगिरी बाळगा

बोलण्यात अडकून ठेवणारे ठग

हॅकर मंडळी आपल्याला बोलण्यात अडकून टाकतात. त्यानंतर ही मंडळी युपीआय अॅॅपवर रिक्वेस्ट पाठवतात. घाईगडबडीत अनेकदा रिक्वेस्ट वाचताना गोंधळ उडतो आणि त्याचा लाभ हॅकर उचलतात. हॅकर हा ग्राहकांच्या गोंधळाचा फायदा उचलतात आणि रिक्वेस्ट मनीच्या माध्यमातून पैसे लाटतात. हॅकर हे एखादे उत्पादन विकण्यासाठी समोरील व्यक्तीला बेजार करतात आणि त्यावेळी ते रिक्वेस्ट मनीच्या पर्यायातून पैसे पाठविण्याचे सांगतात. त्यानुसार संबंधित व्यक्ती रिक्वेस्ट मान्य करतो आणि काही वेळातच खात्यातून संपूर्ण पैसाच गायब होतो.

एसएमएस काळजीपूर्वक वाचा

रिक्वेस्ट मनीतून आलेल्या संदेशावर खात्यातून रक्कम कपात केली जाईल किंवा जमा केली जाईल, असा उल्लेख असतो. परंतु रिक्वेस्ट मनीचा संदेश काळजीपूर्वक वाचला जावू नये याबाबत हॅकर मंडळी सजग असतात आणि ते ग्राहकाला गोंधळात ठेवतात. आपल्याला पैसा पाठवत असल्याचे सांगतात, प्रत्यक्षात ते आपल्याच खात्यातून पैसे काढून घेतात. आपणही त्या संदेशाला हुरळून जातो आणि रिक्वेस्ट मनीला रिप्लाय देतो. त्यातच आपली गल्लत होते आणि फसवणूक होते. म्हणूनच यूपीआयच्या व्यवहारात संदेश काळजीपूर्वक वाचावेत. घाईत कोणताही निर्णय घेऊ नये.

पिनची गरज नाही

यूपीआयशी निगडीत कोणत्याही व्यवहाराला पिनची गरज भासत नाही. तज्ञाच्या मते, यूपीआय अॅॅपमध्ये व्यवहार करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. अशा स्थितीत जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून रिक्वेस्ट मिळते, तेव्हा ती रिक्वेस्ट नामंजूर करायला हवी.

माहिती शेअर करू नका

यूपीआयच्या मदतीने अनेकप्रकारे फसवणूक होऊ शकते. जर एखादा व्यक्ती चुकीने आपली माहिती शेअर करत असेल तर फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. त्याचवेळी अॅॅपमध्ये व्हायरस असू शकतो आणि जो की माहिती चोरून स्वत:च व्यवहार करू शकतो. डिजिटल व्यवहारात फसवणूक होण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढले आहेत.

लक्ष द्या : बँक खात्याचे विवरण, यूपीआय पीन, ओटीपीची माहिती कोणालाही शेअर करू नका. बँकेकडून किंवा एखाद्या वित्तिय संस्थेकडून आपल्याला ओटीपी किंवा पिन मागितला जात नाही. मोबाईल, टॅब, लॅपटॉपमध्ये चांगल्या प्रतीच्या अॅॅन्टीव्हायरसचा वापर करा. अनोळखी संदेशातून अॅॅप डाऊनलोड करू नये. गूगल प्ले व्हेरिफाय मार्फतच अॅॅप इन्स्टॉल करावेत. अॅॅप डाऊनलोड करताना त्याची विश्‍वासर्हता तपासून घ्यायला हवी.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा