कत्तलीसाठी बांधुन ठेवलेली 52 गोवंशीय जनावरांची सुटका

अहमदनगर – सणानिमित्त कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या डांबुन ठेवलेल्या 5 लाख 83 हजार रूपये किंमतीच्या 52 गोवंशीय जनावरांची सुटका कॅम्प पोलिस व पोलिस उपअधिक्षक यांचे पथकातील पोलिसांनी मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा, शाह शरीफ दर्गाच्या पाठीमागील नाल्याच्या झुडपात रविवारी (दि.11) दुपारी 4.30 च्या सुमारास केली.

ही कारवाई चालू असताना नदीम सय्यद, सरफराज शेख, सादिक उर्फ पोटली सय्यद, शहाबाज बाबा जहागिरदार, सादिक अल्लाबक्ष, वसीम मुल्ला व इतर (सर्व रा. मुकुंदनगर) हे पोलिसांना पाहताच पसार झाले. या ठिकाणाहून पोलिसांना 5 लाख 83 हजार रूपयांची 52 जनावरे मिळून आले. पोलिसांनी त्या जनावरांची सुटका केली.

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी हे.कॉ. गोपीनाथ गोर्डे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पशु सुधारणा अधिनियम 1995 चे कलम ब तसेच प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 (ज) व भादंविक 267,34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक देशमुख हे करीत आहेत.

हि कारवाई पोलिस अधिक्षक संदीप मिटके, कॅम्प पोलिस ठाण्याचे स.पो.नि. प्रविण पाटील, पोलिस उपनिरीक्षक एस.टी. लोले, पोलिस उपनिरीक्षक बी.ए. देशमुख, पोलिस उपअधिक्षक बेंडकोळी, तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस.पी. सोळंके, पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या पथकातील पो.ना. मिरपगार, चव्हाण, सलीम शेख, सानप, सुपारे, निमसे कॅम्प पोलिस ठाण्याचे जमादार गायकवाड, हे.कॉ. वराट, घायतडक, पो.ना. सुद्रिक, गोरे, गंगावणे, पो.कॉ. सोनवणे, मोरे, आर.सी.सी. प्लाटुन पुरूष होमगार्ड कर्मचारी यांनी केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा