आरोग्याधिकारी डॉ.अनिल बोरगे यांची मनपाच्या घनकचरा विभागात बदली

अहमदनगर- नगर महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांची तडकाफडकी घनकचरा विभागात बदली करण्यात आली आहे. उपायुक्तांच्या चौकशी अहवालानंतर आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी हे आदेश बजावले असून, बोरगे यांच्याकडील आरोग्य प्रशासन व व्यवस्थापनाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यांचा कार्यभार डॉ. सतीश राजूरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

डेंग्यूसदृश्य आजाराने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याप्रकरणी नागरिकांच्या आंदोलनानंतर आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते. उपायुक्त सुनील पवार यांनी चौकशी अहवाल आयुक्तांकडे सादर केला होता. त्या आधारावर आयुक्तांनी हे आदेश बजावले आहेत. आदेशानुसार डॉ. बोरगे यांच्याकडे आता घनकचरा व्यवस्थापन विभागाचे दैनंदिन कचरा संकलन व वाहतूक तसेच स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे कामकाज सोपविण्यात आले आहे. तसेच कोंडवाडा विभागाचे नियंत्रणही त्यांच्याकडेच राहणार असून मोकाट कुत्रे व जनावरे नियंत्रण व व्यवस्थापनाची जबाबदारीही त्यांच्याकडेच सोपविण्यात आली आहे.

डॉ. बोरगे यांना कार्यमुक्त करत बदली केलेल्या विभागात रुजू होण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले असून, आदेशाचे पालन न केल्यास कारवाईचा इशाराही आदेशातच देण्यात आला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा