अंदमान आणि निकोबार

हा एकूण ३०६ बेटांचा समूह उपसागरात भारताच्या मुख्य भूमीपासून ६२० मैल अंतरावर आहे .या ३०६ बेटांपैकी अंदमान व निकोणार ही मोठी व प्रमुख बेटे आहेत .याची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे आहे. हा भारत सरकारच्या अधिपत्या खाली आहे. नुकत्याच झालेल्या सुनामी वादळामुळे येथे बरेच नुकसान झाले होते .अंदमान भागात ५५० बेटे आहेत .त्यातील ३८ बेटांवर वस्ती आहे .निकोबार भागातील २० बेटांपैकी १२ वर वस्ती आहे .

पोर्ट ब्लेअर येथून मुख्य भूमिपर्यंत विमानसेवा आहे .येथेच कुप्रसिध्द सेल्युलर जेल आहे .जेल १०/३/१९०६  रोजी स्थापन झाला  व १०/३/२००६ ला त्याला  १०० वर्षे पूर्ण झाली . तेथे स्मारक उभारले आहे.दररोज सायंकाळी येथे sound&light शो दाखवितात. या बेटावर मत्स्यालय,फॉरेस्ट म्युझियम,एक लाकूड कापायची सॉ मिल उभारलेली आहे . ही सन  १८३६ मध्ये उभारली आहे  व तेथे  अंदमान  मधील खूप  मोठ्या उंचीच्या  पदौक-andaman redwood झाडावर त्याचे तुकडे  करण्याचा उद्योग करीत.

तसेच येथे भारतीय  नौसेनेचा तळ आहे व सामुद्रिक मरीन म्युझियम आहे. अंदमानच्या दक्षिणेस ६ मैलांवर माउंट हेरीएट नॉशनल पार्क आहे,तेथे जेटीवरून व पुढे रिक्षाने जाता येते .तेथील फॉरेस्ट गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची सोय आहे. या बेटांच्या समूहावर कोरल,विविध प्रकारचे मासे,घनदाट जंगल बघायला मिळते.