नगरचे अमित काकडे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण

अहमदनगर – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत नगरमधील अमित महादेव काकडे देशात 223 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात सहाय्यक कमांडंट म्हणून निवड झाली आहे.

अमित हे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अभियंता महादेव काकडे यांचे पुत्र असून शालेय वयातच त्यांनी हेडबॉय म्हणून नेतृत्व केले होते. तेव्हापासून त्यांच्यावर नेतृत्व गुणाचे संस्कार झाले. 12 वी मध्ये असताना त्यांनी एमबीएची मुलाखतही दिली होती मात्र काही गुण कमी मिळाल्याने त्यांची अंतिम निवड झाली नव्हती तेव्हापासून त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होवून वर्ग-1 अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले. ते बी.ई.सिव्हील पदवीधारक असून पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरु ठेवला होता. पुण्यातील चाणक्य मंडल परिवाराचे व नगरचेच भुमिपूत्र असलेले हैद्राबाद येथील पोलिस आयुक्त महेश भागवत यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल अमित काकडे यांचा आ.संग्राम जगताप यांनी नगरकरांच्यावतीने सत्कार केला. यावेळी हभप तुकाराम कातोरे, नगरसेवक कुमार वाकळे, बाळासाहेब पवार, अजिंक्य बोरकर, आप्पा इथापे व अभियंता महादेव काकडे उपस्थित होते. यावेळी बोलताना आ.जगताप यांनी अमित काकडे यांच्या जिद्द व परीश्रमाचे कौतुक केले. आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. परंतु त्यासाठी अभ्यासात सातत्य, जिद्द व चिकाटी आवश्यक असते. तरच पाहिलेले स्वप्न पुर्ण होवू शकते. अमित याने जे स्वप्न पाहिले ते कठोर परिश्रम घेवून सत्यात उतरविले आहे. त्यांची झालेली निवड ही नगरकरांसाठी भुषणावह बाब आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा