नवनागापुर येथे अखंड हरिनाम सप्ताह

अहमदनगर- नवनागापुर ग्रामदेवस्थानच्यावतीने शनिवारी (दि.11) पासुन गजानन कॉलनी, जि.प.शाळा, नवनागापुर येथे ज्ञानेश्‍वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नवनागापुरचे आप्पासाहेब सप्रे यांनी दिली.

या ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्यात रोज पहाटे 4 वा. काकडा, सकाळी 7 वा. ज्ञानेश्‍वरी पारायण, सायं. 5 वा. हरिपाठ व 7 वा. हरीकिर्तन असे कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती डॉ. संजीव गडगे यांनी दिली.

ज्ञानेश्‍वरी पारायण व्यासपीठाची जबाबदारी ह.भ.प. सदाशिव महाराज गिते यांनी सांभाळली आहे. या सप्ताहात अमोल महाराज बडाख, संजय महाराज गांगर्डे, कल्याण महाराज काळे, शारदाताई सूर्यवंशी, मच्छिंद्र महाराज भोसले, श्रीनिवास महाराज घुगे, बाळासाहेब रंजाळे आदींची हरीकिर्तने होणार आहेत. या सप्ताहात शुक्रवार 17 रोजी दुपारी 3 वा. ज्ञानेश्‍वरी ग्रंथ दिंडी प्रदक्षिणा होणार आहे. या दिंडी सोहळ्यात राजा कोठारी, नवनागापुरचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नवनागापुर पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.

या सप्ताहाची सांगता शनिवारी (दि.18) सकाळी 9 वा. नवनाथ महाराज म्हस्के यांच्या काल्याच्या किर्तनाने होईल. कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी रावसाहेब खराडे, मोहन वाघ, रामदास कारखेले, प्रविण सप्रे, महादेव सप्रे, मनोज टिमकरे, लक्ष्मण होले, नवनाथ काळे, दादासाहेब पुराणे, संजय लिमकर व राजेंद्र शिंदे आदी परिश्रम घेत आहेत. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवनागापुर ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.