केडगावसाठी शहर बससेवा सुरु करावी

नगर- केडगाव उपनगरात शहर बससेवा सुरु नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तरी महापालिकेने केडगाव उपनगरासाठी तातडीने शहर बससेवा सुरु करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात नगरसेविका श्रीमती सुनिता कोतकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी बुधवारी (दि. 4) महापौर बाबासाहेब वाकळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संग्राम कोतकर, बबलू शिंदे, नगरसेवक कुमार वाकळे, संजय ढोणे आदी उपस्थित होते.

सदर निवेदनात नगरसेविका कोतकर यांनी म्हटले आहे की, महापालिका हद्दीत शहर बससेवा सुरु करण्यात आली आहे. तथापी केडगाव उपनगर या सेवेपासून अद्याप वंचित आहे. बससेवा नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तसेच अतिरिक्त पैसा व वेळ खर्च करावा लागत आहे. त्यामुळे बससेवा सुरु करण्याची नागरिक करत आहे. या मागणीची दखल घेऊन केडगाव उपनगरासाठी शहर बससेवा सुरु करावी, अशी मागणी महापौर वाकळे यांच्याकडे करण्यात आली आहे.