अहमदनगरच्या कलावंतांचा आवाज घुमणार राष्ट्रीय वाहिनीवर 

अहमदनगर – सध्या सगळीकडे लाँकडाउन मुळे काम ठप्प झालेली असतांना, नगरच्या कलावंतांच्या बाबतीत एक आनंदाची बातमी  घडलेली आहे. स्टार प्रवाह या लोकप्रिय मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या फाइव स्टार किचन आयटीसी शेफ स्पेशल या मालिकेच्या डबिंग चे काम नगरमध्ये होत आहे. दर शनिवारी आणि रविवारी सकाळी नऊ ते साडेनऊ या वेळात हे भाग प्रसारित होत आहेत.

अहमदनगर फिल्म फाउंडेशन च्या माध्यमातून अहमदनगरच्या कलावंतांसाठी विविध संधी उपलब्ध करून देण्याची कल्पना अहमदनगर मधील उद्योजक गौतम मुनोत यांनी मांडली होती. या अनुषंगाने संस्थेने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून फाइव स्टार किचन या मालिकेचे डबिंगचे काम मुंबईतील निर्मिती संस्था क्लाऊड सेव्हन फिल्म मार्फत नगरमध्ये देण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे सचिव प्रशांत जठार यांनी दिली.

यामुळे आज नगरच्या अनेक कलाकारांना संधी मिळालेली आहे.प्रत्येक भागात दोन नवीन शेफ असून यासाठी लागणारे आवाज नगरचे कलाकार देत आहेत यामधील निवेदकाला आपल्या शहरातील प्रसिद्ध निवेदक आणि नाट्य सिनेकलावंत प्रा. प्रसाद बेडेकर यांचा आवाज वापरण्यात येत आहे तसेच श्री गणेश लिमकर, सायली जोशी, तन्मयी भावे, अपर्णा बालटे आदी कलाकारांनी आतापर्यंत डबिंग केले आहे.

मुंबई पुण्याच्या दर्जाचेच काम नगर मध्ये देखील होऊ शकते हे या निमीत्ताने सिध्द झाले, असे या मालिकेसाठी डबिंग डिरेक्टर म्हणून काम पाहणारे विराज मुनोत यांनी सांगितले.नगर मधील साउंड इंजिनियर श्री सारंग देशपांडे हे या मालिकेत तंत्रज्ञ म्हणून काम पाहत असून त्यांच्याच स्टुडिओ मध्ये हे काम केले जात आहे. तर क्षमा देशपांडे आणी सिद्धी कुलकर्णी या कोआर्डिनेटर म्हणून काम पाहत आहेत. या प्रकल्पाबद्दल अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे श्री शशिकांत नजान, नगरसेवक रवींद्र बारस्कर यांच्यासह विविध मान्यवरांकडून या कलाकारांचे कौतुक होत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा