सचोटी व उत्तम चारित्र्याने एक चांगला शिक्षक घडतो – अशोक मुथा 

अध्यापक विद्यालयात गुरूपौर्णिमा साजरी

अहमदनगर- सचोटी व उत्तम चारित्र्याने एक चांगला शिक्षक घडतो. विद्यार्थ्यांनी गुरूजनांच्या केलेल्या सत्काराबद्दल अशोक मुथा यांनी कौतुक केले व भावी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

प्रमुख अतिथी अॅड. गौरव मिरीकर यांनी त्यांच्या मनोगतात ‘मंत्र मुलम गुरू वाक्यम्’ या श्‍लोकाचा अर्थ समजावून सांगितला व विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

अ.ए.सो.च्या अध्यापक विद्यालयात 16 जुलै रोजी गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक मुथा तर प्रमुख अतिथी म्हणुन शाला समितीचे चेअरमन अॅड. गौरव मिरीकर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात महर्षी व्यासांच्या प्रतिमा पूजनाने व ‘नमोस्तुते व्यास, विशालबुध्दे’ या प्रार्थनेने झाली. श्रीमती बालटे आणि द्वितीय वर्ष छात्राध्यपकांनी स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय करून देताना कॉलेजचे प्राचार्य संदीप उबाळे यांनी ऋषितुल्य अशा श्री मुथा यांचा नीटनेटकेपणा व टापटीप ही वैशिष्ट्ये सांगितली व वेळोवेळी संस्था पदाधिकार्‍यांच्या मिळणार्‍या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले.

विद्यार्थी मनोगतात कु. यशांजली खेंडके, सोनाली भोसले, अभिषेक शिंदे, पुजा खडके यांनी मनोगत व्यक्त केले. गुरूंचे महत्त्व सांगताना विद्यार्थ्यांनी भागवत व ज्ञानेश्‍वरीमधील दाखले दिले. सुत्रसंचालन श्रीमती कुंभार यांनी केले. तर आभार श्री. उपासणी सरांनी मानले.

कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागातर्फे श्रीमती बालटे व श्रीमती कुंभार यांनी केले. सर्व अध्यापकाचार्यांनी, प्राचार्य उबाळे सरांच्या प्रेरणेने कार्यक्रम यशस्वी झाला.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा