संदीप वराळ खून प्रकरणी फरार आरोपी रसाळ यास अटक

अहमदनगर- पारनेर तालुक्यातील निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ हत्याकांड प्रकरणातील दोन वर्षापासून फरार असलेला आरोपी स्वप्नील धोंडीभाऊ रसाळ याला पारनेर पोलिसांनी निघोज परिसरातील रसाळवाडी येथे सापळा रचून शिताफीने अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 12) केली.

संदीप वराळ हत्याकांडातील दोन वर्षापासून फरार असलेला स्वप्नील रसाळ हा निघोज परिसरातील रसाळवाडी येथे येणार असल्याची माहिती पारनेर पोलिसांना मिळाली. यावरून पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील (डी.बी.) पोलिस नाईक अरविंद भिंगारदिवे, पो.ना. विनोद बोरगे. पो. कॉ. शिवाजी कवडे यांनी रसाळवाडी येथे सापळा रचून रसाळ यास शिताफीने अटक केली आहे. स्वप्नील रसाळ याच्याविरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात भादंविक 302,143, 147, 149, 109, 120(ब), भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 व 4/25 प्रमाणे गुन्ह्याची नोंद असून, त्या अन्वये त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा