कारच्या धडकेत एकाचा मृत्यू

अहमदनगर – नगरकडून औरंगाबादकडे जाणार्‍या ओमीनी कारने समोरुन येणार्‍या मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत मोटारसायकलस्वार गंभीर जखमी होवून त्याचा मृत्यू झाला. ही घटना नगर-औरंगाबाद रोडवरील सिटी लॉनजवळ गुरुवारी (दि.7) दुपारी 1.30 वाजता घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, रज्जाक लिलाही शाह (रा.मुकुंदनगर) हा नगर-औरंगाबाद रोडने त्याची मोटारसायकल (क्र.एमएच 16 सीएम 7244) वरुन नगरकडून पाईपलाईन रोडकडे जात असताना औरंगाबादकडे भरधाव वेगाने जात असलेल्या ओमीनी कार (एमएच 12 एचव्ही 1004) ने त्यास जोराची धडक दिली. या धडकेत रज्जाक हा गंभीर जखमी झाला. अपघात घडताच कारचालक घटनास्थळावरुन पसार झाला. घटनास्थळावरील नागरिकांनी रज्जाक यास उपचाराकरीता रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान रज्जाक याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी मुन्नू जलिल अहमद शाह (रा.मुकुंदनगर) याच्या फिर्यादीवरुन भादविक 304 (अ), 279, 337, 427, मोटार वाहन कायदा कलम 184, 134 अ, ब प्रमाणे अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास हे. कॉ.शिरसाठ हे करीत आहेत.