भीषण अपघातात तीन तरुण जागीच ठार

संगमनेर- पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर शहराजवळील कर्हे घाटात ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि.10) मध्यरात्री घडली आहे.

गणेश सुखदेव दराडे (वय 29) रा. कर्हे, श्रीकांत बबन आव्हाड (वय 28) रा. दरेवाडी हे दोघे संगमनेर तालुक्यातील असून अजय श्रीधर पेदाम (वय 27) हा रा. पांजरे, ता. चंद्रपूर येथील आहे. पुणे नाशिक महामार्गावरील नांदुर-शिंगोटे वरून संगमनेरच्या दिशेने जात असताना कर्हे घाटात कार (एम.एच.19, बीजी 8111) पुढे चाललेल्या ट्रकला (एम.एच.12, केपी 1799) पाठीमागून धडकली. अपघात इतका भीषण होता की, कारमधील तिनही युवकांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.वाय. कादरी, पोलीस हवलदार रफिक पठाण, तालुका पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत कारमधील तिघा युवकांना बाहेर काढलं. या भीषण अपघातामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक मध्यरात्री बर्‍याचवेळ विस्कळीत झाली होती.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा