सोशल मिडीयावरून महिलेची बदनामी करणारा फरारी अटकेत

अहमदनगर- उच्च शिक्षित तरूणीच्या नावाने फेक फेसबुक अकाऊंट बनवुन तिची बदनामी करून धमकी देऊन दोन वर्षांपासुन फरार असलेल्या आरोपीस सायबर पोलीसांनी सापळा रचुन सातारा जिल्ह्यातील गोडोली येथील संभाजीनगर येथुन अटक केली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, आकाश शरद सोनटक्के (रा. सातारा) याने नगरमधील एका उच्चशिक्षित तरूणीच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून तिच्या भावास त्या बनावट अकाऊंटवरून मेसेज करून तुझ्या बहिणीचे लग्न कसे होते ते पाहतो? ज्या मुलाशी तिचे लग्न ठरेल, त्याला मी मारून टाकीन, अशी धमकी जुलै 2017 मध्ये दिली होती. याप्रकरणी सायबर पोलीसांनी गु.र.नं. 5/2017 माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 66 (क) सह भादंविक 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात आरोपी आकाश सोनटक्के हा सातारा येथे असल्याचे निष्पन्न झाले होते. परंतु तो मोबाईल व त्याचे ठिकाण नेहमी बदलत असल्याचे मिळून येत नव्हता.

सायबर पोलीसांनी तांत्रिक विश्‍लेषण करून सातारा शहरात दोन दिवस थांबून स्थानिक पोलीसांची मदत घेऊन सोनटक्के यास संभाजीनगर, गोडोली येथे सापळा रचून अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक वैभव महांगरे, पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी, हे.कॉ. योगेश गोसावी, उमेश खेडकर, पो.ना. राहुल हुसळे, पो.कॉ. राहुल गुंडू, अरूण सांगळे, पो.कॉ. अरकल, चालक वासुदेव शेलार यांनी केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा