आयुषमान भारत योजनेतून 5 लाखापर्यंत मोफत आरोग्य विमा

महापालिका हद्दीत नागरिकांना कार्डचे वाटप

अहमदनगर- आपले सरकार सेवा केंद्र (ओम सुविधा केंद्र) अंतर्गत आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप दि.9 ऑगस्ट रोजी नगरसेवक प्रकाश भागानगरे व राष्ट्रवादीचे माणिकराव विधाते यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्‍विनी मरकड यांनी आयुष्यमान भारत योजनेची माहिती दिली. सदर योजनेअंतर्गत नागरिकांना 5 लाखापर्यंत मोफत आरोग्य विमा मिळणार आहे. आपले सरकार केंद्राच्या संचालिका श्रीमती मिनाताई शेटे यांनी ओम सुविधा केंद्र, महात्मा फुले चौक, मार्केटयार्ड येथे आयुष्यमान भारत या योजनेचे ऑनलाईन नोंदणी सुरु असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.