आयुर्वेदीय आहारवेद – काय खावे?

वेलची

अगदी प्राचीन काळापासून वेलचीचा वापर आहारीय पदार्थांसोबतच औषधी वनस्पती म्हणूनही केला जातो. मराठीत ’वेलची’ किंवा ’वेलदोडे’, हिंदीमध्ये ’छोटी इलायची’, संस्कृतमध्ये ‘एला’, तर इंग्रजीमध्ये ’कार्डमॉमम’, तर शास्त्रीय भाषेत ‘इलेट्टारिआ कॅरडामोमम’ (Elettaria Cardamomum) या नावाने ओळखली जाणारी वेलची ’झिंझिबरेसी’ या कुळातील आहे.

वेलचीचे रोप हे हळदीच्या रोपाप्रमाणे सहा ते नऊ फूट उंच वाढते. त्याची पाने एक ते दोन फूट लांब, तीन इंच रुंद व खालील बाजूने मखमलीसारखी मऊ असतात. त्याची फुले लालसर पांढर्‍या रंगाची व सुगंधी असतात. त्याची लागवड करताना वेलचीचे बी लावले जाते. जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये वेलचीची लागवड केली जाते. याच्या वाळलेल्या फळांच्या आत काळ्या रंगाच्या बारीक बिया असतात. त्या बिया म्हणजेच वेलची होय. वेलची ही अत्यंत सुगंधी असल्याने तोंडाची दुर्गंधी दूर करून मुखशुद्धीसाठी वेलचीचा वापर केला जातो. स्वयंपाक, मिठाई, सरबत वा मुरांबा, मसाले व आयुर्वेदिक औषधांमध्ये वेलचीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार : वेलची तिखट अग्निप्रदीपक, लघु व रूक्ष आहे. ही सुगंधी असल्याने हृदयासाठी हितकारक, दीपक, पाचक, वातहारी, उत्तेजक असून, दाहनाशक व पोटदुखीनाशक आहे.

आधुनिक शास्त्रानुसार : वेलचीमध्ये कर्बोदके, प्रथिने, तंतुमय पदार्थ, ऊर्जा, ’अ’ व ’क’ जीवनसत्त्वे, कॅल्शिअम, लोह, सोडियम, पोटॅशिअम, रिबोफ्लेविन, थायमिन, झिंक ही सर्व घटकद्रव्ये असतात.

उपयोग :

1) अति उच्च रक्तदाब, हृदयरोग या विकारांवर वेलचीचा चांगला परिणाम दिसून येतो. वेलचीपूड व मध यांचे दिवसातून दोन वेळा चाटण केल्यास छातीत होणारी धडधड कमी होऊन हृदयाचे ठोके नियमित पडतात.

 डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा