आयुर्वेदीय आहारवेद – काय खावे?

लवंग

9) लवंग जंतुनाशक, कीटकनाशक, कृमीघ्न, पूर्तिरोधक आणि स्तंभक कार्य करणारी असल्याने आयुर्वेदात अनेक विकारांवर लवंगेचा वापर करण्यास सांगितला आहे. म्हणून लवंगादी वटींचा वापर अनेक विकारांवर निष्णात वैद्य करीत आहेत.

10) वारंवार तहान लागत असेल व पाणी पिऊनही तहान भागत नसेल, तर एक ग्लास पाण्यामध्ये चार लवंगा उकळाव्यात. थोड्या थोड्या अंतराने दोन-दोन चमचे हे पाणी प्यायल्यास तहान शमते.

11) गर्भवती स्त्रीला उलटी, मळमळ यांचा त्रास जास्त जाणवल्यास भाजलेली लवंग तोंडात धरावी किंवा लवंग गरम पाण्यात भिजवून ते पाणी घोट-घोट त्या स्त्रीला प्यायला दिल्यास उलट्यांचा त्रास त्वरित थांबतो.

12) खोकल्याची उबळ येणे, दम लागणे, सर्दी जाणवणे, छातीमध्ये आखडणे हे विकार दूर करण्यासाठी गरम पाण्यात लवंग तेलाचे काही थेंब टाकून ती वाफ श्वासाद्वारे आत घ्यावी.

13) दातांचा व हिरड्यांचा पायरिया हा आजार घालविण्यासाठी दातांना व हिरड्यांना लवंग तेलाने मालीश करावे.

14) रात्री डास खूप चावत असतील, तर अशावेळी संपूर्ण अंगाला लवंगतेल चोळावे. यामुळे डास जवळ येत नाहीत.

15) लवंगेमध्ये ’अ’ जीवनसत्त्व व बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असल्याने ते शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवून शरीर सुदृढ ठेवते.

16) ’ब’ जीवनसत्त्व (पायरिडॉक्सीन थायसिन) ’बी-1’ जीवनसत्त्व, तसेच ’क’ जीवनसत्त्व लवंगेमध्ये भरपूर प्रमाणात असल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यास मदत होते.

सावधानता : लवंगांचे मसाल्यामध्ये प्रमाणात सेवन करावे. त्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यास डोळे, जठर, आतडे, मूत्राशय व हृदय यामध्ये दाह निर्माण होऊन वाईट परिणाम होऊ शकतात.

लवंगांची पूड ही आवश्यकतेप्रमाणे ताजीच बनवावी. आधीच बनवून ठेवल्यास त्याचा सुगंध कमी होऊन त्यातील उर्ध्वगमनशील तेलही उडून जाते.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा