आयुर्वेदीय आहारवेद – काय खावे?

मिरे

9) रांजणवाडी खूप सुजून डोळ्याची पापणी दुखत असेल, तर मिरे पाण्यात वाटून त्याचा सूक्ष्म कल्क रांजणवाडीवर लावावा. म्हणजे रांजणवाडी त्वरित पिकून फुटते. त्यातील पू निघून गेल्यामुळे आराम मिळतो. फक्त हा लेप लावताना तो डोळ्यात जाणार नाही याची मात्र काळजी घ्यावी. वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यावा.

10) एखाद्या व्यक्तीला तापामुळे किंवा दुःखद घटना ऐकल्याने बेशुद्धावस्था आली असेल, तर अशा वेळी त्या व्यक्तीच्या नाकामध्ये मिरीचे सूक्ष्म चूर्ण फुकले असता त्याला असंख्य शिंका येऊन त्याची बेशुद्धावस्था नाहीशी होऊन तो शुद्धीवर येतो.

11) अजीर्ण, अपचनाचा त्रास होत असेल, तर सुंठ, मिरी, पिंपळी (त्रिकटू) याचे चूर्ण मधातून चाटण केल्यास अपचनाचा त्रास होत नाही.

12) ताप खूप येऊन अशक्तपणा वाटत असेल व मन बेचैन झाले असेल, तर अशा वेळी काडे चिराईता बरोबर मिरेपूड घेतल्यास मनाची बेचैनी कमी होऊन ताप निघून जातो.

सावधानता : मिर्‍याचे अतिरिक्त सेवन झाले, तर जठर, आतड्यांमध्ये दाह होणे, पोटात दुखू लागणे, उलट्या होणे, मूत्राशय व मूत्रनलिकेत तीव्र दाह होणे, गुदनलिकेत व शौचाच्या जागी दाह होणे आणि त्वचेवर शीतपित्ताच्या गाठी होणे ही लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे आढळल्यास मिर्‍याचा उपयोग सावधानतेने करावा व डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा. उन्हाळ्यामध्ये मिर्‍याचा वापर करणे टाळावे.

मिर्‍याचा वापर जर योग्य प्रमाणात केला, तर ते रसायनाप्रमाणे कार्य करून रोगप्रतिकारशक्ती वाढवून दीर्घायुष्य प्राप्त होते. म्हणूनच गृहिणीने स्वादिष्ट, रुचकर भोजनासाठी योग्य प्रमाणात सावधानतेने मिर्‍यांचा वापर करावा.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा