आयुर्वेदीय आहारवेद – काय खावे?

मिरची

गरम मसाल्यामध्ये मिठाच्यानंतर मिरचीचे स्थान येते. प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाकघरात आवश्यक असणारा पदार्थ म्हणजेच मिरची होय, मीठ-मिरचीशिवाय भोजन रुचकर होत नाही. मराठीमध्ये ‘मिरची’, हिंदीमध्ये ‘मिर्च’, संस्कृतमध्ये ‘तीष्णा’ किंवा ’उज्वला’, इंग्रजीमध्ये ‘चिली’, तर शास्त्रीय भाषेमध्ये कॅप्सिकम अनम’ (Capsicum nnuum) या नावाने प्रसिद्ध असलेली मिरची ‘सोलॅनसी’ कुळातील आहे.

रंगानुसार लाल व हिरवी मिरची असे दोन प्रकार आहेत. तर तिच्या तिखटपणावरून कोल्हापुरी, गोमंतकी, लवंगी आणि सिमला मिरची असे प्रकार पडतात. मिरचीचे उत्पादन संपूर्ण जगात घेतले जाते. तर भारतामध्ये गुजरात व महाराष्ट्रामध्ये याचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. कोल्हापुरी मिरच्या या रंगाने लालभडक, बारीक व लांब असतात. तर गोमंतकी मिरची ही आकाराने मोठी व गोल असून, त्याची साल जाड असते. लवंगी मिरची आकाराने अतिशय लहान परंतु स्वादाने अति तिखट असते. सिमला मिरची ही स्वादाने अजिबात तिखट नसते, तर आकाराने एक ते तीन इंच घेराची जाड व तीन ते सहा इंच लांब असते. ही मिरची तिखट नसल्यामुळे तिची भाजीही केली जाते.

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार : मिरच्या उष्ण, तिखट, दीपक, पाचक, पित्तकारक, रक्तवर्धक, कृमीनाशक, कफ, आम व वातनाशक असतात. परंतु तिच्या अतिरिक्त सेवनाने त्या दाहकारकही बनतात. मिरच्यामुळे तोंडास चव येते. अग्नी प्रदीप्त होतो आणि घेतलेल्या अन्नाचे शोषण होऊन भोजन रुचकर लागते.

आधुनिक शास्त्रानुसार : मिरचीमध्ये प्रथिने, कर्बोदके, उष्मांक, स्निग्धता, मेद, ‘बी-6’, ’अ’, ‘क’, ’के’ जीवनसत्त्व, लोह, कॉपर, पोटॅशिअम, तंतुमय पदार्थ ही सर्व पौष्टिक घटकद्रव्ये असतात.

उपयोग :

1) आहारामध्ये मिरच्यांचा उपयोग करताना सहसा पातळ सालीपेक्षा जाड सालीच्या मिरच्यांचा उपयोग करावा. जाड मिरच्या पातळ सालीच्या मिरच्यांपेक्षा कमी तिखट असून, त्या शरीराला जास्त हानिकारक नसतात.

2) चटणी, कोशिंबीर, भाजी, आमटी, सांबार, पोहे, चिवडा, कढी यामध्ये हिरव्या मिरच्यांचा उपयोग करावा. परंतु आयुर्वेदानुसार हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरची वापरणे शरीरासाठी जास्त हितकारक असल्याने शक्य त्या वेळी लाल मिरचीचाच वापर करावा.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा