आयुर्वेदीय आहारवेद – काय खावे?

कोकम/आमसूल

9) हातापायांची उष्णतेमुळे आग होत असेल, तर कोकमचे तेल संपूर्ण अंगाला चोळावे. यामुळे उष्णता कमी होऊन दाह कमी होतो.

10) हिवाळ्यात थंडीमुळे जर ओठ फुटत असतील, तर कोकमचे तेल कोमट करून ओठांवर लावावे. याने ओठ मऊ होतात.

11) हिवाळ्यामध्ये शरीराची त्वचा कोरडी होऊन भेगा पडत असतील, तर कोकमचे तेल गरम करून शरीरावर चोळल्यास भेगा नाहीशा होतात.

12) रोजच्या आहारामध्ये कोकमचा नियमितपणे वापर केल्यास अरुची, आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन इ. तक्रारी दूर होऊन आहाराचे पचन चांगले होते.

13) कोकम तेलाचा उपयोग विविध प्रकारची मलमे बनविण्यासाठी केला जातो.

14) कोकमचा उपयोग नियमितपणे आहारात केल्याने आतडे कार्यक्षम होऊन पोट साफ होण्यास मदत होते.

15) दहा तोळे कोकम पाण्यात भिजत घालावे. नंतर ते पाण्यात कुस्करून पाणी गाळून घ्यावे. त्यात जिरेपूड, साखर घालून ते पाणी प्याले असता शरीरावर आलेले शीतपित्त दूर होते.

16) मूळव्याधीचा त्रास होत असेल व त्यातून रक्त पडत असेल, तर कोकमचा कल्क दह्यावरच्या निवळीत कालवून ती निवळी प्यावी. यामुळे रक्त पडणे बंद होते.

सावधानता : कोकम आम्ल गुणधर्माचे असल्यामुळे ते जास्त प्रमाणात आहारात वापरल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो. छातीत जळजळणे, पोटात आग होणे, तोंडाला आंबट पाणी येणे अशी लक्षणे निर्माण होऊ शकतात. म्हणून त्याचा वापर प्रमाणातच करावा.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा