आयुर्वेदीय आहारवेद – काय खावे?

कोकम/आमसूल

4) कोकममध्ये पाणी घालून त्याचा कल्क (पेस्ट) बनवावा व हा कल्क पाण्यात टाकून त्यात विलायची खडीसाखर घालून सरबत बनवावे. सरबत प्यायल्याने आम्लपित्त, दाह, तृष्णा, उष्णतेचे विकार दूर होतात.

5) कोकमचा कल्क, नारळाचे दूध, कोथिंबीर व थोडे ताक एकत्र करून त्याची सोलकढी बनवून जेवणासोबत प्यावी. यामुळे घेतलेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते.

6) अतिसार (जुलाब), संग्रहिणी आणि रक्ताचे जुलाब पोटात मुरडा येऊन होत असतील, तर कोकमचा फांट करून प्यावा.

7) अंगावर पित्त उठले असल्यास कोकमचा कल्क संपूर्ण अंगास लावावा.

8) पोटात कळ येऊन आव पडत असल्यास कोकमचे तेल भातावर घालून तो भात खावा.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा