आयुर्वेदीय आहारवेद – काय खावे?

कोथिंबीर

जेवणाचा स्वाद वाढविणारी रुचकर, सुगंधी अशी कोथिंबीर स्वयंपाकात वापरली जाते. प्रत्येक पदार्थ बनविल्यानंतर त्याची सजावट करतानासुद्धा कोथिंबिरीचा वापर केला जातो. कोथिंबिरीचा सुगंध भूक वाढवितो आणि मन प्रसन्न करतो. हिची पाने नाजूक आणि आकार नागमोडी असतो. याच पानांचा उपयोग आपण स्वयंपाकासाठी करतो. याचे देठ मऊ, नाजूक आणि फिकट हिरवे असते.

या देठांचा उपयोग भाजीच्या रश्शासाठी करता येतो. या वनस्पतीस पांढर्‍या जांभळसर रंगाची छत्रीच्या आकाराची गुच्छामध्ये फुले येतात. कालांतराने त्याचे रूपांतर फळामध्ये होते. यालाच धणे असे म्हणतात. या धण्यांचा उपयोग त्याला असणार्‍या सुगंध व चवीमुळे गरम मसाला करण्यासाठी होतो. तसेच यापासून धण्याची डाळही बनविता येते.

मराठीत ‘कोथिंबीर’, हिंदीमध्ये ‘हरा धनिया’, संस्कृतमध्ये ‘धान्यक’, इंग्रजीमध्ये ‘कोरिएन्डर’, तर शास्त्रीय भाषेत ‘कोरियन्ड्रम सँटीव्हम’ (Cariandrum Sativum) या नावाने ओळखले जाते. कोथिंबीर वनस्पती ‘अंबेलिफिरी’ या कुळातील आहे.

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार : कोथिंबीर शीत गुणात्मक, अग्निदीपक, पाचक, तृष्णाशामक, मूत्रल, वातानुलोमक आहे.

आधुनिक शास्त्रानुसार : कोथिंबिरीमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ‘अ’, ’ब’, ’क’ जीवनसत्त्वे, पोटॅशिअम, प्रथिने, स्निग्धता, तंतुमय व पिष्टमय पदार्थ असतात. या सर्व गुणधर्मामुळे कोथिंबिरीचा आहाराबरोबरच औषधी वनस्पती म्हणूनही वापर केला जातो.

उपयोग :

1) रोजच्या जेवणामध्ये ताज्या कोथिंबिरीची चटणी एक-दोन चमचे खाल्ली असता अपचन, आम्लपित्त, अन्नावरील वासना कमी होणे, पोटात गुबारा धरणे, अल्सर, मूळव्याध इ. विकार होत नाहीत.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा