आयुर्वेदीय आहारवेद – काय खावे?

आले/सुंठ

14. मूळव्याध झालेल्या रुग्णांनी सुंठेचे चूर्ण ताकात घालून प्याल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होतो.

15. सौंदर्य वाढविण्यासाठी सुंठ बहुगुणी आहे. रोज सुंठेचा काढा घेतल्यास त्वचेचा रंग उजळतो. चेहरा टवटवीत होतो. शरीर सुदृढ बनते. रक्त शुद्ध झाल्यामुळे चेहर्‍यावरील काळे डाग, फोड, नाहीसे होतात व मन देखील प्रसन्न राहते. काहींना वारंवार अॅलर्जिक सर्दीचा त्रास होतो. अशा रुग्णांनी रोज सुंठ टाकून उकळलेले पाणी प्यावे किंवा गृहिणीने रोज पाण्याच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर टाकावी.

16. जीर्ण ज्वर झालेल्या रुग्णांनी ताकामधून सुंठचूर्ण सलग तीन आठवडे घेतल्यास जीर्ण ज्वर निघून जातो.

17. संधिवात आणि अपचनाचे विकार दूर करण्यासाठी सुंठ व गोखरू समप्रमाणात घेऊन त्याचा काढा तयार करावा. हा सुंठेचा काढा अपचन दूर करून संधिवात हा आजार बरा करतो.

18. लहान मुलांना वारंवार जंत होत असतील, तर ते नष्ट करण्यासाठी सुंठ अणि वावडिंगाचे चूर्ण मधामध्ये एकत्र करून चाटण द्यावे.

19. वारंवार जुलाब होत असतील, तर ते बंद करण्यासाठी सुंठ आणि वाळा पाण्यात घालून उकळावे व ते उकळलेले पाणी थंड झाल्यानंतर प्यायला दिल्यास जुलाब होणे बंद होते.

20. वारंवार पोटात मुरडा येऊन जुलाब होत असतील किंवा संग्रहणी रोग झाला असेल, तर तो नाहीसा करण्यासाठी गाजर वाफवून त्यामध्ये जिरेपूड आणि सुंठपूड घालून खायला दिल्यास संग्रहणी आजार बरा होतो.

सावधानता : आले व सुंठ हे अत्यंत गुणकारी पदार्थ असले, तरी त्याचा वापर हा विवेकानेच करावा. पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी सहसा आले व सुंठ टाळलेलीच बरी. तसेच ग्रीष्म (उन्हाळा) व शरद ऋतूत याचा वापर सावधानतेने करावा.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा