आयुर्वेदीय आहारवेद – काय खावे?

आले/सुंठ

6. लघवीला वारंवार जाऊन उष्णतेचा त्रास जाणवत असेल, तर आल्याचा रस व खडीसाखर एकत्र करून पाण्यात मिसळावे व ते पाणी एक-एक कप याप्रमाणे दिवसातून तीन वेळा प्यावे.

7. अर्धशिशीचा त्रास जाणवत असेल, तर आले बारीक करून त्याचा कल्क कपाळावर लावावा.

8. मुखशुद्धीसाठी लिंबाचा रस आणि मिठाबरोबर आले सेवन करावे.

9. हृदयरोग असणार्‍या रुग्णांनी रक्तवाहिनीतील अडथळे दूर होऊन हृदय कार्यक्षम होण्यासाठी आल्याचा रस व तुळशीचा रस एकत्र करून त्यामध्ये पाणी समप्रमाणात मिसळून ते पाणी दिवसातून दोन वेळा प्यावे.

10. शरीरातील अतिरिक्त चरबी हटविण्यासाठी व सुडौल बांधा राखण्यासाठी आलेरस, आवळारस, तुळस, पुदिना, जिरे यांचे मिश्रण पाण्यात उकळून ते पाणी दिवसभर प्याले असता अतिरिक्त चरबी कमी होते.

11. गर्भवती स्त्रियांना अनेक वेळा उलटी, मळमळ यांचा त्रास होतो. अशावेळी पाण्यामध्ये अर्धा चमचा ज्येष्ठमध पावडर व आलेरस एकत्र करून ते पाणी दिवसभर थोडे थोडे प्याल्यास तोंडास रुची उत्पन्न होऊन मळमळीची भावना कमी होते.

12. उदरवात, अग्निमांद्य, आमवृद्धी नाहीशी करण्यासाठी, तसेच तोंडास रुची उत्पन्न करण्यासाठी, भूक वाढविण्यासाठी आल्याचा पाक घेणे फायदेशीर ठरते. आलेपाक तयार करण्यासाठी ताज्या आल्याचा रस काढावा. रसामध्ये थोडे पाणी, साखर घालून त्याचा पाक तयार करावा.

पाक तयार झाल्यानंतर त्यामध्ये वेलची, केसर, लवंग, जायफळ, जायपत्री घालून हे संपूर्ण मिश्रण चिनीमातीच्या बरणीत भरून ठेवावे. हा पाक वर्षानुवर्षे चांगल्या अवस्थेत राहतो. या पाकाचा आवश्यक असेल त्या वेळी वापर करावा.

13. कावीळ झालेल्या रुग्णाला सुंठ आणि गूळ एकत्र करून एक-एक चमचा सकाळ-संध्याकाळ दिल्यास कावीळ बरी होते.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा