आयुर्वेदीय आहारवेद – काय खावे?

आले/सुंठ

मसालेदार पदार्थांबरोबरच औषधी वनस्पती म्हणूनही आल्याचा वापर केला जातो. मराठीमध्ये ‘आले’, हिंदीमध्ये ‘अद्रक’, संस्कृतमध्ये ‘आर्द्रक’ किंवा ’शृगबेरा’, इंग्रजीमध्ये ‘जिंजर’, तर शास्त्रीय शाषेत ‘झिंजिबर ऑफिसिनेल’ या नावाने ओळखले जाणारे आले ‘झिंजिबरेसी’ कुळातील आहे.

भारतामध्ये आल्याची सर्वत्र लागवड केली जाते. आल्याच्या गाठी रोपून त्याची लागवड केली जाते. उष्ण प्रदेश व पाणी साचून राहणा-या रेताड जमिनीत आल्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात, तर गुजरातमध्ये खेडा जिल्ह्यात आल्याची लागवड जास्त प्रमाणात केली जाते. याचे रोप दीड ते दोन फूट उंच असते. त्याची पाने लहान वेलचीच्या पानांसारखी असतात. रोप जसजसे वाढू लागते, तसतशी त्याची मुळे जमिनीत पसरतात. या मुळाच्या कंदालाच ’आले’ असे म्हणतात. आले सुकवून त्यांची ‘सुंठ’ बनविली जाते.

सुंठ तयार करण्यासाठी आल्याच्या गड्यांना चिकटलेल्या मुळ्यातील माती आणि गड्यांवरील साल काढून टाकावी लागते. यासाठी आले बराच वेळ पाण्यात भिजत ठेवून, धुऊन साफ करावे लागते. आल्याची साल खरवडून काढली जाते. त्यानंतर ते 8 ते 9 दिवस उन्हात वाळवून त्यापासून सुंठ तयार केली जाते. आले व सुंठेचे गुणधर्म साधारणत: सारखेच असतात. फक्त सुंठेपेक्षा आले अधिक सौम्य असते.

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार : आले जड, तीक्ष्ण, उष्ण, अग्निप्रदीपक, उत्तेजक व वायुनाशक आहे. रसाने व पाकाने शीतल, मधुर, तिखट व हृदयास हितावह आहे.

आधुनिक शास्त्रानुसार : आले, सुंठ हे मसाल्यातील पदार्थ असून त्यामध्ये प्रथिने, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ’क’ जीवनसत्त्व, तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात.

उपयोग :

1. आल्याचा मुरांबा, अवलेह, पाक व लोणचे बनविता येते. आल्यात मीठ, तिखट, लिंबाचा रस घालून लोणचे बनविता येते. तोंडास रुची नसणे, भूक कमी लागणे, पोटात गॅस धरणे. अशा अनेक विकारांवर लहान मुले, तरुण मुले, गर्भवती स्त्रिया, बाळंतीण स्त्रिया, वृद्धावस्थेतील व्यक्ती आरोग्य चांगले राखण्यासाठी आल्यापासून बनविलेल्या पदार्थांचा निर्भयतेने वापर करू शकतात.

2. सर्दी होऊन तीव्र डोकेदुखी जाणवत असेल तर आले, तुळस, पुदिना, गवती चहा एकत्र करून नैसर्गिक चहा बनवून प्यायल्यास डोकेदुखी नाहीशी होते.

3. आल्याचा रस, लिंबूरस आणि सैंधव एकत्र करून जेवणाच्या सुरुवातीस घेतल्यास मुखशुद्धी होऊन अग्नीप्रदीप्त होऊन भूक चांगली लागते.

4. आल्याच्या रसात मध घालून प्यायल्याने खोकल्यात, श्वासविकारात फायदा दिसून येतो.

5. थंडीतापामध्ये आल्याचा आणि पुदिन्याच्या काढा करून प्यायल्यास घाम येऊन ताप उतरतो.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा