आयुर्वेदीय आहारवेद – काय खावे?

आयुर्वेदिक उपचार : शरीराचे बल वाढविण्यासाठी च्यवनप्राश, शतावरी कल्प असे रसायन उपचार घ्यावेत. या ऋतूत वातसंचय होत असल्याकारणाने पंचकर्म उपचारामध्ये बस्ती उपचार लाभदायक ठरतात. तरी तज्ज्ञ डॉक्टरांकडून आपली प्रकृती परीक्षण करून योग्य ते पंचकर्म ठरवावे.

3) वर्षा ऋतुचर्या आपल्या साहित्य ग्रंथामध्ये वर्षा ऋतू (पावसाळा) बद्दलचे वर्णन अतिशय सुंदर केलेले आहे.

पर्जन्यवृष्टी भिजवी जनाला । निवारती घेउनि टोपी तयाला ॥

आनंद सर्वा जनतेसी झाला । वर्षा ऋतू उद्भवी सस्यमाला ॥

या ऋतूमध्ये खूप जोराने वारे वाहतात. आकाश ढगांनी भरून येते व त्यामुळे पर्जन्यवृष्टी होते. पावसामुळे सर्व जनता भिजते. डोंगर, दर्‍या हिरव्यागार दिसतात. त्यावर विविध जातींची व रंगांची फुले फुलतात. ओढे, नद्या, तलाव पाण्याने भरून वाहतात. सृष्टीचे प्रसन्न व मनमोहक दृश्य दिसते. कारण याच काळात शेतीमध्ये पिकाची लागवड करता येते. पावसापासून संरक्षण होण्यासाठी डोक्यावर टोपी घालावी, असे कवितेमध्ये सांगितले आहे. कारण पावसामध्ये भिजून सर्दी-खोकला, ताप असे विविध साथीचे आजार होतात. म्हणून घराबाहेर पडताना छत्री बाळगावी.

शरीरदोष अवस्था : ग्रीष्म ऋतूमध्ये वातसंचय झालेला असतो. या वर्षा ऋतूमध्ये सतत पडणार्‍या पावसामुळे हवामान आर्द्रतायुक्त व थंड असते. त्यामुळे शीत गुण वाढीला लागून वातप्रकोप होतो व अशक्तपणा आणखीनच वाढतो. या ऋतूत अशक्तपणा, पचनशक्ती कमी जाणवणे ही लक्षणे जास्त प्रमाणात जाणवतात.

आहार : सतत पावसाळी हवामानामुळे पचनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे पचण्यास हलका व योग्य प्रमाणात आहार घ्यावा. अशक्तपणा असल्यामुळे बर्‍याच जणांना वाटते, की शरीराची शक्ती वाढवली जाईल असा आहार घ्यावा. परंतु शक्ती वाढवणारे सर्व पदार्थ पचण्यास जड असतात. या ऋतूत पचनशक्ती कमी असल्याने असे जड पदार्थ खाल्ल्यावर पचनशक्ती अजूनच कमी होऊन विविध आजारांची लागण होते. सुरुवातीला भूक कमी असल्या कारणाने हलका आहार घेऊन पचनशक्ती वाढवावी व काही दिवसांनंतर हळूहळू शरीराला बळ देणारे पदार्थ कमी मात्रेत वापरावेत.

आहारामध्ये सुंठ, मिरी, पिंपळी, हिंग, कोथिंबीर, लसूण, आले, जिरे, पुदिना, तुळस, यांसारखे दीपकपाचक पदार्थ जास्त प्रमाणात खावेत. यामुळे पचनशक्ती सुधारते. गायीचे तूप जास्त प्रमाणात सेवन करावे. यामुळे अग्नी प्रदीप्त होतो व वातदोष कमी होतो. फोडणीसाठी तेलाचा वापर करावा. तेल, तूप असे स्निग्ध पदार्थ भरपूर खावेत, परंतु तळलेले पदार्थ खाऊ नयेत. कारण असे पदार्थ पचण्यास जड असतात व पित्त वाढविणारे असतात.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा