आयुर्वेदीय आहारवेद – काय खावे?

जव/बार्ली

जव ऊर्फ बाल हे जगातील चौथ्या क्रमांकाचे महत्त्वाचे अन्नधान्य असून, यामध्ये गव्हाइतकीच प्रथिने व क्षारद्रव्ये असतात. त्याच्या या औषधी गुणांमुळेच शरीराचा बांधा योग्य राखण्यास त्याची मदत होते. हे धान्य मराठीमध्ये ‘जव’, संस्कृतमध्ये ‘यव’ किंवा ’शतपर्विका’, इंग्रजीमध्ये ‘बार्ली’, तर शास्त्रीय भाषेत ‘हॉडयम व्हलगैरे’ या नावाने ओळखले जात असून, ते ‘पोएसी’ या ‘तृणधान्य कुळातील आहे. जव हे दिसायला बरेचसे गव्हासारखेच असते, परंतु गव्हाइतकी त्याला चव नसते. जवाच्या दाण्यावरचे साल काढल्यानंतर त्याला पर्ल बार्ली असे म्हणतात. हे दाणे गव्हापेक्षा आकाराने छोटे असतात. शुद्ध केलेल्या जवाचे स्कॉच बार्ली व पर्ल बार्ली असे अनेक प्रकार बाजारात मिळतात. रशिया, अमेरिका, जर्मनी, चीन व युरोपातील ब-याचशा भागांत बार्ली पिकते. तसेच सहारा व तिबेट इकडेही बार्लीचे पीक घेतले जाते. भारतात घोटी, महाराष्ट्र, गोवा, गुजरात या ठिकाणी बार्लीचे पीक घेतले जाते.

औषधी गुणधर्म : रूक्षो मेध्यश्च मधुरो व्रणे शस्तोऽग्निवर्धनः । स्वर्यो वण्र्यो लेखनश्च मूत्रबंधकरो गुरुः ।

आयुर्वेदानुसार : सालासह असलेला जव तुरट, मधुर व शीत गुणधर्माचा असून वृष्य, सारक, किंचित रूक्ष, बुद्धिवर्धक, अग्निवर्धक असून स्वर आणि त्वचेचा वर्ण सुधारतो.

आधुनिक शास्त्रानुसार : जवामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, ’क’ जीवनसत्त्व व थोड्या प्रमाणात ‘बी’ जीवनसत्त्व, तसेच प्रथिने, तंतुमय व पिष्टमय पदार्थ, स्निग्धता व आर्द्रता असते. जवामध्ये प्रथिने व ‘बी’ जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असून, त्यातील प्रथिने हे मका, घेवडा यापेक्षाही उत्तम दर्जाचे असते. जवाला अंकुर फुटल्यानंतर त्याला माल्ट असे म्हणतात. मोड आणलले जव वाळवून तयार केलेले जवाचे पीठ हे अधिक पौष्टिक असते.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे दुर्वांकुर

वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगरमोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा