आध्यात्मिक मोती (जागृत जीवनाकरीता)

अनुभव सर्वश्रेष्ठ आहे

ज्या व्यक्तींनी लहानपणीच आध्यात्माची शिकवण प्राप्त केली आहे ते भाग्यवान आहेत. ते दररोज आपला काही वेळ आध्यात्मि क साधनेत घालवतील तर ते याच जीवनात देहभासाचे वर येण्याच्या कलेत निपूण होऊ शकतील. पोहण्यासारखेच हाही अभ्यास केला पाहिजे. दररोज ध्यान अभ्यासाने आमची आध्यात्मिक कुशलता विकसीत होईल. ज्यामुळे आम्ही अशा ठिकाणी पोहचू जेथे आम्हांस अंतरीक आध्यात्मिक मंडळांचा अनुभव येईल. आम्ही जर ध्यान अभ्यासाच्या कलेत निपुण झालो तर त्या नावाड्याप्रमाणे की जो पोहणे जाणत होता. आम्हीही जीवनातील खवळलेल्या महासागरास यशस्वीपणे पार करून जाऊ आणि आध्यात्मिक बंदरामध्ये आश्रय घेऊ.

विचार करून मैत्री करा – बरेच लोक आपल्या जमिनीत हलक्या प्रतीच्या गुलाबाच्या रोपावर उत्तम, उत्कृष्ट, सुंदर गुलाबाचे कलम करतात. जेणेकरून हलक्या प्रतीच्या गुलाबातून उत्तम गुलाब मिळतील असे केल्याने हलक्या प्रतीच्या गुलाबाची प्रत चांगल्या गुलाबाच्या प्रतीत होईल. वरील दृष्टांत आमच्या जीवनातही मार्गदर्शक होऊ शकतो. असे म्हटले जाते की, एखादा माणूस त्याच्यासोबत संगतीने ओळखला जातो. जर आम्ही श्रीमंत बनू इच्छितो तर श्रीमंत व्यक्तीच्या सोबत राहिले पाहिजे असे केल्याने आम्ही त्यांच्याप्रमाणेच विचार करू आणि त्यांच्यासारखेच कार्य करू व यामुळे आम्ही श्रीमंत होऊ शकतो.

आम्ही जर धावपटू बनू इच्छितो तर आम्ही धावपटूच्या सान्निध्यात राहिले पाहिजे. ज्यामुळे आम्ही त्यांच्यासारखे जीवन व्यतित करण्यास प्रवृत्त होऊ. अशाने आम्ही अधिक व्यायाम करू, स्वतःला बलवान करू, आहारावर लक्ष देवू आणि धावण्याचा अभ्यास करू. आम्ही जर लेखक बनू इच्छितो तर आम्हांस लेखकाच्या संगतीत राहिले पाहिजे आणि त्याकलेचे अनुसरण करण्याकरीता त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. अशाच प्रकारे जर आम्ही आध्यात्मिक दृष्टीने विकास करू इच्छितो तर जे लोक स्वतः आध्यात्मिक दृष्टीने विकसित झालेले आहेत अशा लोकांच्या संगतीमध्ये आम्ही राहिले पाहिजे. अशा लोकांमध्ये आम्ही आत्मा व परमात्म्याच्या बाबतीत विचारविनिमयामध्ये अधिक वेळ घालवू. आध्यात्मिक विषयावर चर्चा करू आणि आध्यात्मिक अभ्यासामध्ये वेळ घालवू.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा