आध्यात्मिक मोती (जागृत जीवनाकरीता) – सर्वांना आपल्यातील उत्तमोत्तम द्या

संगीत कार्यक्रम संपला आणि सर्व लोक निघून गेले. तेव्हा चौथ्या संगीतकाराने आपल्या सर्व जोडीदारांना बोलावले आणि त्यांना एक पत्र दाखविले तो म्हणाला, एक श्रोता जाण्यापूर्वी आपल्याकरीता हे पत्र देऊन गेला आहे. त्याने ते पत्र उघडले ह्या पत्रात लिहिले होते की, आज रात्रीच्या आकर्षक, मैफिलीबद्दल धन्यवाद. त्या पत्रावर हस्ताक्षर होते. आपला राजा. ह्या गोष्टीतून आम्हांला काही महत्त्वपूर्ण गोष्टी शिकावयास मिळतात.

संगीतकारांतर्फे ज्या रात्री उत्तम गाण्याची मैफिल करण्याचा निर्णय झाला होता, त्या रात्री तेथील राजाने आपली उपस्थिती लावून सर्वांना आश्चर्य चकीत केले. मात्र त्या संगीतकारांनी त्या रात्री उत्तम कार्यक्रम करण्याचे ठरविले होते तो कार्यक्रम ऐकण्यास मग कोणीही येवो. अशाच प्रकारचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही प्रत्येक कार्य केले पाहिजे. हा दृष्टीकोन आम्हास असे दर्शवितो की आमच्या सर्वांच्या अंतरी परमात्मा वास करीत आहे. प्रत्येक जण हा महत्त्वाचा आहे असे समजून कार्य केले पाहिजे. आमच्या सर्वांच्या अंतरी आत्मा वास करीत आहे आणि आम्ही सर्व त्या परमात्म्याचे अंश आहोत. आम्ही जेव्हा असा दृष्टीकोन ठेवून कार्य करू की प्रत्येक मनुष्य आमच्या पासून आमच्यातील सर्वोत्तम प्राप्त करण्याचा अधिकारी आहे. तेव्हा आम्ही प्रत्येकामध्ये विद्यमान प्रभुचा आदर करू.

काही लोक फक्त ठराविक लोकांना खुष,संतुष्ट करण्याकरीताच मेहनत घेतात असे लोक आपल्या अधिकार्‍यास, श्रीमंतांना वा ज्यांच्याकडून त्यांना काही भेट मिळणार असेल त्यांनाच आपले सर्वो त्तम देवू शकतात. परंतु गरीबांकरीता वा ज्यांच्या जवळ देण्यासाठी काही नाही अशा लोकांकरीता जे सर्वोत्तम करतात, जे सर्वांशी एक सारखेच वागतात, ते लोक महान आहेत. आणखी एक संदेश (उपदेश) आहे की जेव्हा आम्ही काही कार्य करतो अशावेळी आम्हांला असे वाटते की, यामुळे काही ठराविकच लोक फायदा घेत आहेत वा काही निवडकच लोक त्या कार्याची प्रशंसा करीत आहेत.

तेव्हा आम्ही निराश होऊ नये. असे म्हटले गेले आहे की जरी आम्ही एखाद्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल घडवून आणू शकलो तर आमचे जीवन जगण्यालायक आहे. आम्ही जेव्हा काही प्रयत्न करतो आणि जरी अपेक्षेप्रमाणे तेथे गर्दी गोळा झाली नाही, तरीही आम्ही इतरांकरीता मग एक असो की दोन असो आम्ही त्यांची मदत करतो. आम्ही कधीही असा विचार करू नये की आम्ही काही करण्याची योजना बनविली होती परंतु त्याचा लाभ अत्यंत अल्प लोकांना होत आहे यास्तव ही योजना करणे योग्य नाही.