आध्यात्मिक मोती (जागृत जीवनाकरीता) – सर्वांना आपल्यातील उत्तमोत्तम द्या

चौथा संगीततज्ञ शांतपणे बसून त्या सर्वांची चर्चा ऐकत होता. अन्य संगीततज्ञ त्याकडे वळाले आणि त्याला विचारले की, तुझे काय मत आहे?’’ तो म्हणाला, ‘‘मला समजले की तुम्ही निराश झाला आहात. मी पण निराश झालो आहे परंतु जे लोक कार्यक्रमास येतात त्यांच्या विषयी आमची जबाबदारी आहे की आम्ही कार्यक्रम चालूच ठेवावा आणि आपल्या पात्रतेनुसार प्रत्येकवेळी चांगलेच कार्यक्रम करावे.

इतर लोक येत नाही, हा जे लोक येतात त्यांचा दोष नाही. आम्ही खराब कार्यक्रम करून येणार्‍यांना शिक्षा करू नये. या संगीततज्ञाचे अशा प्रकारचे उद्गार ऐकून इतर संगीतकार उत्साहीत झाले आणि त्यांनी आपला कार्यक्रम चालू ठेवण्याचा निश्चय केला. त्या रात्री त्यांनी आपल्या जीवनातील सर्वोत्तम संगीत कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम केला.