आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या रुग्णसेवेची किर्ती संपूर्ण राज्यात पसरली – डॉ.प्रदिप मुरंबीकर

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आयोजित पोटाचे विकार तपासणी शिबीराला नागरिकांचा प्रतिसाद

अहमदनगर – रुग्णसेवा हीच ईश्‍वरसेवा या भावनेने आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य चालू आहे. आनंदऋषीजी म.सा. यांनी मानवसेवेची शिकवण दिली असून, त्या प्रेरणेनेच हॉस्पिटल सर्वसामान्यांना सेवा देत आहे. हॉस्पिटलच्या रुग्णसेवेची किर्ती संपूर्ण राज्यात पसरली असल्याची भावना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिप मुरंबीकर यांनी व्यक्त केली.

राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषी म.सा. यांच्या 119 व्या जयंतीनिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्व.अजय गांधी यांच्या स्मरणार्थ अशोकलाल अभयकुमार गांधी परिवाराच्या सहकार्याने आयोजित पोटाचे विकार तपासणी व उपचार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.मुरंबीकर बोलत होते. यावेळी प्रकाश गांधी, आनंद गांधी, सुनिता गांधी, सविता गांधी, माधवी गांधी, डॉ.वैभव अजमेरे, डॉ.आशिष भंडारी, डॉ.वसंत कटारिया आदिंसह जैन सोशल फेडरेशनचे सदस्य उपस्थित होते.

प्रास्ताविकात डॉ.प्रकाश कांकरिया यांनी अल्पदरात आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये दिली जात आहे. रुग्णसेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे कार्य हॉस्पिटल करीत असून, जैन सोशल फेडरेशनने या सेवेत सातत्याने वाढ केली आहे. जिल्ह्यात अद्यावत एकमेव ह्रद्यशस्त्रक्रिया विभाग, नेत्रविभाग आदी आजारासंबंधी असलेले विविध अद्यावत विभाग दर्जेदार सेवा देत असल्याने हॉस्पिटलचे नाव संपूर्ण भारतात झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ.वैभव अजमेरे यांनी सर्व प्रकारचे यकृताचे (लिव्हर) व स्वादूपिंडाचे आजार, कॅन्सर, पित्त, बध्दकोस्टाच्या आजारांवर अद्यावत उपचार पध्दती व निदान आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या शहरात जाण्याची गरज भासत नाही. सर्व प्रकारच्या स्कोपी, गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, इंडोस्कोपी, पीईजी ट्युब प्लेसमेंन्ट, इसोफिजीअल आदी सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

संतोष बोथरा म्हणाले, दरवर्षी शिबिराच्या माध्यमातून रुग्णसेवेचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये चालू आहे. शिबिराचे आयोजक रुग्णसेवेला हातभार लावत असून, सर्वसामान्यांचे दु:ख, वेदना व विकार दूर करण्याचे काम संतांच्या आशिर्वादाने येथे केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर ग्रामीण भागात जाऊन आनंदऋषीजी हॉस्पिटल देत असलेल्या रुग्णसेवेची माहिती दिली.

या शिबिरात डॉ.वैभव अजमेरे यांनी 180 रुग्णांची पोटाच्या विकारासंबंधी मोफत तपासणी व उपचार केले. यामध्ये पोट, यकृत, स्वादुपिंडाच्या आजारासह कॅन्सरसंबंधी तपासण्या करण्यात आल्या. यावेळी सर्व प्रकारच्या स्कोपी रुग्णांसाठी अल्पदरात उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा