आनंदधाम येथे स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा

अहमदनगर – आनंदधाम येथे श्री कुंदनऋषिजी पदमऋषिजी व चातुर्मासानिमित्त विराजमान श्रमणी अक्षयश्रीजी आखा जी म. सा. यांच्या सान्निध्यात अतिथि माजी खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते 15 ऑगस्ट झेंडावंदन व रक्षाबंधन कार्यक्रम झाला.

याप्रसंगी स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा देऊन माजी खासदार दिलीप गांधी म्हणाले की, आज आपण येथे 73 वा स्वतंत्रता दिवस साजरा करीत आहोत. आजची ही स्वतंत्रता आपल्याला त्या शहीदांच्या, देशाच्या वीर जवानांच्या, देशाच्या क्रांतिकारीयांच्या अमुल्य बलिदानामुळे आपल्याला आज मिळालेली आझादी आहे. आज हा तिरंगा झेंडा आकाशाच्या उंचीवर फडकतो तेव्हा आपल्या सर्वांच्या चेहर्‍यावर आपोआपच प्रसन्नता दिसते.

रहें तिरंगा ऊंचा हरदम बात है यह सम्मान की

देश भक्ति वंदे मातरम हर दिल के अरमान की

उन शहिदों, क्रांतीकारियों, वीरों के बलिदान की

सदा सलामत रहे हमेशा धरती हिंदुस्तान की

हा तो भारत देश आहे जो सदैव समृद्ध आणी बलशाली आहे. आपल्या देशावर सतत दुश्मनांची नजर राहिलेली आहे. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्ता यांचे कर्तृत्व आपल्या सर्वांच्या समोर आहेच. आपल्या देशावर कितीही व कोणतीही संकटे आली. नैसर्गिक आपत्ति आली तरी त्या संकटांना न घाबरता आपण त्याचा मुकाबला करु तरच आपण साजरा करित असलेला स्वतंत्रता दिवस सार्थ होईल असे मला वाटते.

याप्रसंगी श्रावक संघाचे उपाध्यक्ष आनंदराम मुनोत, नितीन कटारिया, संतोष गांधी, अभय लुणिया, आनंद चोपडा, संतोष बोथरा, राजेश बोरा, अजित बोरा, नितीन शिंगवी, प्रितम गांधी, आणि भाविक भक्त उपस्थित होते.

गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे कोल्हापुर, सांगली, सातारा, इचलकरंजी, नाशिक, पुणे महाराष्ट्रातील पुरग्रस्त भागातील बांधवांवर जी नैसर्गिक आपत्ति झाली त्यातून त्यांना सावरण्यासाठी आपण सर्वांनी मदत करावी, असे आवाहन याप्रसंगी दिलीप गांधी यांनी केले. 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस नगर शहरात येत आहेत त्या दिवशी आपण गोळा केलेला पुरग्रस्त मदत निधी त्यांच्याकडे देऊ.

याप्रसंगी कुंदन ऋषिजी म. सा. म्हणाले की, संकटाच्यावेळी मदत करणे व रक्षा करणे हाच आपला मानव धर्म आहे. आज खुप छान योगायोग आहे आज स्वतंत्रता दिवस आहे व रक्षा बंधन दिवस आहे. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याची रक्षा करणे आपले प्रथम कर्तव्य आहे.

भारत त्यौहारों का देश है इसमें से एक त्यौहार है रक्षाबंधन । यह एक खुशीयों का त्योहार है । रक्षाबंधन का त्योहार एक ऐसी परंपरा है जो हमें आपस में जोड़ती है । जोड़ता है इसलिए इसे आज भी रक्षाबंधन का त्योहार बडे हर्ष और उल्लास के साथ मनाया जाता है । रक्षा और स्वतंत्रता सभी चाहते है इसीलिए रक्षाबंधन का पवित्र पर्व और राष्ट्रीय त्योहार स्वतंत्रता दिन 15 अगस्त आज साथ आए हैं । रक्षाबंधन कहता है स्वयं की रक्षा करों, निर्बलों की रक्षा करना तुम्हारा दायित्व है और राष्ट्र धर्म कहता है हर मानव स्वतंत्र है, स्वतंत्र होना तुम्हारा जन्म सिद्ध अधिकार है ।

रक्षाबंधन एवं स्वतंत्रता दिन यही बताता है कि तुम रक्षा के बंधन में आवो और स्वतंत्र बनने के लिए अपने अधिकार को प्राप्त करने जागृत बनो । आज के इस अवसर पर यही दो मंत्र याद रखों रक्षक और स्वतंत्रता यह दो अदभूत शक्तियां हैं और यही हमारा धर्म है । ही प्रेरणा देऊन श्रमणी अक्षयश्रीजी म. सा. यांनी उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या व रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

रक्षाबंधन निमित्ताने आयोजित भाई बहन मांगल्य जापचे आयोजन श्रावक संघाच्यावतीने करण्यात आले. यामध्ये दहा चांदीच्या व एक सोन्याची राखी लकी ड्रॉ ठेवण्यात आला. तसेच महाराज साहेबांनी अभिमंत्रित केलेली राखी उपस्थित प्रत्येकाला श्रावक संघाच्यावतीने देण्यात आली. आपल्या भारत देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे वीर जवान क्रांतिकारी यांना शत् शत् नमन अभिनंदन व श्रद्धासुमन अर्पित करून देशाच्या 73 व्या स्वतंत्रता दिवसाच्या निमित्ताने आयोजित आनंदधाम येथील झेंडावंदन व रक्षाबंधनाच्या कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार श्रावक संघाचे सेक्रेटरी नितीन कटारिया यांनी व्यक्त केले. श्रावक संघातील सर्व सदस्यांनी उपस्थित सर्वांना पेढा भरवुन स्वातंत्र्य दिनाच्या व रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा