मकरसंक्रांतीला आनंदधाम येथे मंगलपाठ कार्यक्रम

अहमदनगर – आनंदधामच्या प्रांगणात मकरसंक्रातीनिमित्त बुधवार 15 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता आचार्यश्री आनंदॠषीजी महाराज यांचा ध्वनिमुद्रित मंगलपाठ होणार आहे.

प्रत्येकाला सणानिमित्त मंगलकारी मंत्र मिळावा, सणाचा आनंद व्दिगुणित व्हावा यासाठी या विशेष मंगलपाठ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास श्रावक श्राविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांच्यासह श्रावक संघाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा