‘आधार’ ने रिटर्न कशासाठी?

आधार कार्डमार्फत प्राप्तीकर विवरणपत्र भरणार्‍यांना कोणत्याही व्यक्तीला नवीन व्यवस्थेतंर्गत प्राप्तीकर खाते स्वत:च पॅन क्रमांक देणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) चे प्रमुख प्रमोद चंद्र मोदी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. देशातील तब्बल 120 कोटी नागरिकांना आधार क्रमांक मिळाला आहे. 41 कोटी नागरिकांना पॅन क्रमांक दिला असून आतापर्यंत 22 कोटी पॅन नंबर ‘आधार’शी लिंक झाले आहेत. आधार-पॅनला जोडण्याची 30 सप्टेंबर ही डेडलाइन आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात आधारमार्फतही रिटर्न भरण्याची तरतूद करण्यात आली. बायोमेट्रिक ओळखपत्र आधार हे रिटर्नसाठी पुरेसे असल्याचे म्हटले आहे. अर्थात पॅनचा उपयोग संपलेला नाही, मात्र दोन्हीचा डेटाबेस एकमेकांना वापण्यासाठी अतिरिक्त सुविधा म्हणून याकडे पाहता येईल.

डेटाबेसला जोडण्याची तयारी

आधार नंबरने रिटर्न भरणार्‍यांना प्राप्तीकर अधिकारी आता स्वत:च पॅन क्रमांक बहाल करणार आहेत. त्यामुळे पॅनचा वापर न करताही आधारच्या मदतीने रिटर्न भरणार्‍यांना पॅन दिले जाईल आणि कालांतराने एकमेकांशी जोडले जाईल. दोन्हीचा डेटाबेस जोडण्याची आवश्यकता सीबीडीटीने बोलून दाखविली आहे. तसेच कायद्यातही तशी तरतूद केली आहे.

करचुकवेगिरी रोखण्याची तयारी

कर तज्ञांच्या मते, कर अधिकार्‍यांकडे कलम 139 नुसार पॅन क्रमांक देण्याचा अधिकार आहे. करचोरी रोखण्यासाठी प्राप्तीकर विभाग आणि यूआयइडीएआय या दोन्ही विभागाने पॅन आणि आधारच्या डेटाबेसला लिंक केले आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीची माहिती मिळवणे सोयीचे झाले आहे आणि करचुकवेगिरीला देखील आळा बसणार आहे.

पॅनचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न नाही

‘आधार’ ने रिटर्न भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने पॅनचे महत्त्व कमी होणार नाही. या पावलाकडे चुकीच्या पद्धतीने पाहिले जात असल्याचे सीबीडीटीचे म्हणणे आहे. भविष्यातही पॅनचे महत्त्व कायम राहणार आहे. प्राप्तीकर विवरण भरणार्‍यांसाठी ही अतिरिक्त सुविधा म्हणून पाहवे. प्राप्तीकर विवरणपत्र भरण्यात अडथळा येऊ नये आणि देशातील अधिकाधिक नागरिकांनी रिटर्न भरावेत या उद्देशाने ‘आधार’ च्या मदतीने रिटर्न भरण्याची सोय केली आहे. शेवटी ‘आधार’ ने रिटर्न भरणार्‍यांना पॅननंबरही दिला जाणार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा